राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. अपक्ष आमदारांनी आपल्यालाच मतदान करावं, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. असं एकंदरित राजकीय वातावरण असताना अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अपक्ष आमदारांनी सर्व पत्ते पिसून ठेवले असून ते फक्त टाकणं बाकी आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. रवी राणा यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

त्यांनी म्हटलं की, “राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला हे पत्ते केवळ टाकायचे आहेत. अपक्ष आमदारांनी मिळून अपक्ष खासदार संजय काकडे यांना निवडून दिलं होतं. संजय काकडे यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी अपक्ष आमदारांनी मोठी ताकद लावली होती, त्यामध्ये मीही होतो. त्यामुळे यावेळी देखील अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला ते फक्त टाकायचे आहेत. अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत, असंही ते म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले…?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपाकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचं संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. “महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत”, असंही राऊत म्हणाले.

Story img Loader