जातीवर किंवा कुठल्या विशिष्ट लोकांवर हल्ले केलेले नाहीत. उद्रेक, जाळपोळ करायची नाही ही आमची भूमिका आहे. हिंसाचाराचं समर्थन आम्ही कधीही केलेलं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. चांगली घटना जिथे घडली नाही तिथे जात आणून चालत नाही. आमच्याकडेही काही गोष्टी घडल्या तिथे कुठे कुणी आले? असा प्रश्न छगन भुजबळ यांना उद्देशून मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. कुठलाही हल्ला, जाळपोळ कशाचंही समर्थन आम्ही करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माणसाने थोडसं भानावर येऊन बोललं पाहिजे. साखळी उपोषण करणारे मुलं, शांततेत आंदोलन करणारी मुलं घरी परतल्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन बदनाम व्हावं म्हणून काही गोष्टी केल्या गेल्या. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं. साखळी उपोषण करणाऱ्यांना उचलून नेत आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल बोललो आहेत. ओबीसींचं आरक्षण संपवायचं आहे असं भुजबळ म्हणाले आहेत पण त्यांचं आरक्षण कसं काय संपणार? आयोगाच्या माध्यमातून जे मराठा समाजाचं हक्काचं आहे तेच द्या म्हणतोय. आम्ही कुणाचंही आरक्षण काढा म्हणत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले.

जातनिहाय जनगणना करायची ही मागणी भुजबळ करत आहेत म्हणजे ज्याच्या विहिरीत पाणी त्यानेच असं बोलावं असा प्रकार आहे. जातनिहाय जनगणना करायची असेल तर जरुर करा आमचं काही म्हणणं नाही असंही जरांगे पाटील म्हणाले. छगन भुजबळ आता पातळी सोडून बोलू लागले आहेत असंच म्हणावं लागेल. निवृत्त न्यायाधीश आले होते चांगली गोष्ट आहे. आम्ही जनता आहोत. न्यायाधीश आले होते त्यांनी माझा जीव वाचवला त्याबद्दल जर भुजबळ असं म्हणत असतील तर मग काय बोलणार? एकमेकांना नमस्कार केला त्यात चुकीचं काय? भुजबळ तर आलेच नाहीत. तेव्हा तर जीव घ्यायला निघाले होते जेव्हा आमच्यावर लाठीचार्ज केला होता. दगडफेक झाली म्हणत असतील तर चौकशी करा. लाठीचार्जचा कट कुणी केला? त्याचाही शोध लावा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. उच्चस्तरीय चौकशी करा अशीही मागणी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या.

मी सरकारला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा. आमचं आरक्षण आत्तापर्यंत तुम्हाला दिलं होतं. आम्हाला आणि सरकारला लक्षात आलं आहे की आमचं आरक्षण तिथे आहे त्यामुळे आम्ही आमचा हक्क मागतो आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. आमचंच आरक्षण आहे पण द्यायचं नाही म्हणून हा सगळा कांगावा चालला आहे असंही जरांगे पाटील पत्रकारांना म्हणाले.