सांगलीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी राज्याला पुन्हा आपली एकजूट दाखवली. आपल्याला एकजुटीशिवाय पर्याय नाही. माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगली शहरातून आवाहन आहे आपल्या लेकराबाळांचा उन्हाळा झाला आहे. त्यांच्यासाठी सावली धरायची हे आपलं आता काम आहे. आपली एकजूट दाखवून द्या, वेगवेगळे गट दाखवू नका. मराठ्यांची राज्यात सध्या त्सुनामी आली आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगलीच्या सभेत म्हटलं आहे.

मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगायचं आहे की एकत्र या, एकजूट दाखवा. ज्या मराठा बांधवांना आरक्षण असेल त्यांनी एकत्र या आणि नाही त्यांनीही एकत्र यावं. आता बिनकामाचे कळप एकत्र येत आहेत, मात्र तुमचा मराठा बांधव इथे उभा आहे. मराठा समाजाच्या लोकांना जात वाचवणं गरजेचं आहे. उद्यापासून एकजूट दाखवा ही तुम्हाला मी तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

आपल्याला आव्हान पेलायचं आहे, आपल्या लेकराच्या हितासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आत्ता आपण त्याचीच तयारी करायची आहे. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. जातीवर रचलेलं षडयंत्र, चारही बाजूने टाकलेला वेढा हे सगळं उधळण्याचं काम मराठा समाजाचंच आहे. ७० वर्षांपासूनचे पुरावे मिळाले आहेत. समितीने पुरावे शोधायला सुरुवात केली. मराठा ५० टक्क्याच्या आत आहे, मराठा ओबीसीच्या आरक्षणात आहे हे सिद्ध झालं आहे. मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात येण्यासाठी सगळे निकष पूर्ण केले आहेत. आपली जात संपवण्यासाठी चारही बाजूने प्रयत्न होत आहेत. हा वेढा आपल्याला उठवायचा आहे, त्यासाठी आपली एकजूट दाखवून देऊ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

एकही राजकारणी आपल्याला मदत करणार नाही, कुणीही राजकीय नेता आपल्या मदतीला येणार नाही. तुम्ही त्यांना साहेब म्हणता, साहेबांना मोठं केलं, त्याच्या वडिलांना मोठं केलं. मात्र ते आपल्याला मदत करायला येणार नाही. प्रत्येक पक्षाला मराठ्यांनी मोठं केलं. सगळ्यांनाच मोठं व्हायला मदत केली. त्या नेत्यांना आपण मोठं केलं कारण आपल्या बापजाद्यांना वाटलं होतं की हा माणूस मोठा झाला की आपल्या लेकराबाळांना मदत करेल. मात्र एकही राजकीय नेता आपल्याला मदत करत नाही. त्यामुळे आपण त्याला मोठं केलं कशाला? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Story img Loader