मराठा कुणबी जातीचे प्रमुख जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत महाराष्ट्र सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेत जी समिती नेमली. या समितीसमोर मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाने आणि ७० नागरिकांनी मराठा कुणबी नोंदी असल्याच्या पुराव्याच्या प्रति सादर केल्या. यावेळी समाजातील बांधवांनी २०० वर्षांपूर्वीची जुनी तांब्यावर भांडी आणि त्यावर असलेली मराठा-कुणबीची नोंदही समितीला दाखवली.
छत्रपती संभाजी नगरमधल्या बेगमुरा मराठा पंच कमिटीच्या वतीने जे जुने सामान आहे यावर कुणबी म्हणून लिहिलेली आहे सर्व भांडे घेऊन आज मराठा समाजातील काही नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे आलेल्या शिंदे समितीसमोर पुरावे म्हणून ठेवण्यात आले होते.
आज विभागीय आयुक्त कार्यालयात आम्ही जुनी भांडी घेऊन आलो होतो. २०० वर्षांपूर्वीची ही भांडी आहेत. त्यावर कुणबी मराठा अशी नोंद आहे. मराठा पंचायत कमिटी तर्फे आम्ही आज निवेदन दिलं आहे. आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास आहोत त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असं मराठा बांधवांनी म्हटलं आहे. निजाम काळात उस्मानाबाद, बिदर जिल्हा होत्या. मी त्यावेळच्या नोंदी आणल्या आहेत. आम्हाला आता लवकरात लवकर आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कुणबी-मराठा आणि मराठा हे एकच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिलंच पाहिजे अशी मागणी बिदरच्या बालाजी आगलावे यांनी केली आहे. आम्हाला जर कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर त्याचा परिणाम भाजपाला लोकसभा निवडणुकीत दिसेल असंही त्यांनी म्हटलं आहे.