पंढरपूर : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या सकल मराठा समजामध्ये फुट पडली आहे. कार्तिकी एकादशी गुरुवारी (दि.२३) असून मराठा समाजाचा एक गटाने उपमुख्यमंत्री महापूजेला आल्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका पत्रकार परिषदेतून मांडली. तर दुसऱ्या गटाने जर उपमुख्यमंत्री महापूजेला आले तर आडवणार अशी भूमिका जाहीर केली. दरम्यान, या शासकीय पूजेसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला आमंत्रित करावे, या बाबतचा विधी व न्याय विभागाचा अभिप्राय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला अद्याप प्राप्त झालेला नाही.

हेही वाचा >>> ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन; पहिला हप्ता प्रतिटन साडेतीन हजार रुपये देण्याची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आयोजन

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात राहिली आहे. मराठा समजाला आरक्षण मिळावे या करिता उपमुख्यमंत्री अथवा कोणताही मंत्री यांना महापूजेस येण्याबाबत विरोध केला होता. मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सरकार सकारत्मक आहे. लाखो बांधवांना दाखले मिळाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी महापूजेस यावे तसेच विठ्ठला चरणी हात ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यास शंभर टक्के कटिबद्ध आहोत, असे जाहीर करावे, अशी मागणी सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाने जाहीर केली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, संतोष कवडे, विनोद लटके, सुमित शिंदे आदी उपस्थित होते. तसेच या बाबत एक निवेदन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

मात्र या भूमिकेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री यांनी शासकीय महापूजेस येवू नये, हट्टाने आले तर होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. आमचा विरोध कायम असल्याची भूमिका गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केली.

Story img Loader