मराठा आरक्षणासाठीचा सर्वात मोठा लढा हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला आहे. त्यांच्या आंदोलनावर आंतरवली सराटी या ठिकाणी जेव्हा लाठीमार झाला त्यानंतर या मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. त्यांनी आपलं म्हणणं शांतपणे पण तितक्याच ठामपणे वारंवार मांडलं. दोनवेळा ते उपोषणालाही बसले होते. तसंच आज सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरीही चालेल मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसंच आज मनोज जरांगे पाटील यांनी वाशीतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यादेश मिळाला पाहिजे नाहीतर आझाद मैदानात येणार अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ वाद गाजला

मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा हा लढा सुरु केला त्यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असाही एक वाद निर्माण झाला. कारण ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. त्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले. अशात आता मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा वाशीत आल्यानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले आहेत छगन भुजबळ?

“कायद्याचा कसोटीवर जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांमध्ये काय बसतं आहे ते सरकार पाहतं आहे. मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला हे लक्षात आलं तर निश्चितपण ओबीसींचंही आंदोलन सुरु होईल. मला वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करुन योग्य निर्णय घेतील. जी आमची मतं आहेत ती आम्ही सभांमधून मांडत असतो. मात्र ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करु” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha community should be given reservation but if injustice is done to obcs we will also protest warns chhagan bhujbal scj
Show comments