मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. तसेच, आता ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग, अशी शंकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे. ते पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण, मराठा समाजानं स्वतंत्र १०, १२ किंवा १५ टक्के आरक्षण घ्यावं. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही.”
“…तरीही ते गरीब आहेत”
“समोरच्या लोकांच्या मागण्या वाढत आहेत. त्यांची लेकरे बाळं गरीब असल्यानं आरक्षण पाहिजे. २०० जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात येते, तरीही ते गरीब आहेत,” अशी टीका भुजबळांनी केली आहे.
“शिवाजी महाराजांच्या सेनेला मराठा सेना नव्हते, तर…”
“मराठा समाजाला आमचा विरोध नाही. पण, मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे. अेक ठिकाणी आमची लायकी काढली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता. शिवाजी महाराजांच्या सेनेला मराठा सेना नव्हते, तर मावळ्यांची सेना म्हटलं गेलं,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.
“सार्वजनिक शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली”
“छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली. सार्वजनिक शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली. शिवाजी महाराजांवर महात्मा फुले यांनी पहिला पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांवर अमर शेख यांनी दुसरा पोवाडा लिहिला,” असं भुजबळांनी म्हटलं.