मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह बंड केलं. या बंडानंतर शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. यावरून, शिंदे गटातील आमदारांत प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. या आरोपांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री होण्यासाठी गद्दारी केली, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

जळगावमधील बिलखेडा येथे विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर गुलाबराव पाटील बोलत होते. “गुलाबराव पाटील गद्दार झाले, गद्दार झाले म्हणतात. पण, गद्दार झालो नाही, एक मराठा चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता. म्हणून त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहे? तुम्ही कोणत्याही गोष्टीत जातीयवाद करत असाल, तर होय गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेंसाठी त्याग केला.”

हेही वाचा : अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

“गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसतो. हाच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे. विरोधाला विरोध करायचा, पण मतदारसंघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत एक साधी मुतारी हे लोकं बांधू शकले नाहीत आणि भाषण ठोकतात,” अशी टीका गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर केली आहे.

Story img Loader