मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष प्राशन केले आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात एक ऑडिओ क्लीपही व्हायरल होत होती. दरम्यान, माझ्यावरील आरोप खोटे असून या ऑडिओ क्लीपची चौकशी करावी, अशी मागणी करत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र, ऋतुजा लटकेंनीही दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “विरोधी पक्षाच्या…”

Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Dombivli Nigerian citizen committed suicide by jumping from 15th floor
डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Devendra Fadnavis on Assembly Election 2024
Rahul Narwekar : भाजपाने मुंबईतील पहिली बंडखोरी रोखली; पक्षातील नाराजी नाट्यावर अखेर पडदा!
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
avinash Jadhav anand ashram
उमेदवारी जाहीर होताच मनसेचे अविनाश जाधव आनंद आश्रमात
ravikant tupkar s krantikari shetkari sanghatana
रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल

रमेश केरे पाटील हे मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये दोन व्यक्ती बोलत असल्याचे दिसतेय. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी केरे यांनी पैसे घेतले, असा आरोप या ऑडिओ क्लीमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर माझा याच्याशी संबंध नसल्याचे केरे यांनी सांगितले होते. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून ही ऑडिओ क्लीप व्हायरल होत असल्यामुळे माझी बदनामी होत असल्याचे म्हणत रमेश केरे यांनी विष प्राशन केले. मुंबईत असताना त्यांनी विष प्राशन केले असून त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र, ऋतुजा लटकेंनीही दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “विरोधी पक्षाच्या…”

फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न

रमेश केरे पाटील यांनी फेसबुकवर लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये ते माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, असे म्हणत आहेत. “माझ्या समाजाचे नुकसान होईल, असे मी आतापर्यंत काहीही केलेले नाही. समाजाला न्याय मिळावा म्हणून मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. माझी होत असलेली बदनमी मी सहन करू शकत नाहीये. अण्णासाहेब जावळे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी २० वर्षांपासून काम करत होतो. माझी बादनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. त्यांना माफी मिळायला नको. महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करत आहे,” असे रमेश केरे पाटील आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले आहेत.