शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महापुरुषांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सत्ताधारी तसेच राज्याच्या राज्यपालांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीमधील घटकपक्षांनी शनिवारी पुकारलेल्या आंदोलनाचा फोटो म्हणून राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाचा जुना फोटो ट्वीटरवरुन शेअर केल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. सोमवारी मुंबईतील शिवसेना भवानासमोर संजय राऊतांच्या फोटोला शाई फासून ते फोटो जाळत मराठा क्रांती मोर्चाकडून राऊतांचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दरवेळेस राऊत मराठा समाजाच्या अस्मितेबद्दल वादग्रस्त विधाने करत असल्याचं अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची राऊत यांची लायकी नसल्याची टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा