मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवण येथे येणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी दिली. दरम्यान मालवण राजकोट किल्ल्यावर झालेला प्रकार हा राज्याला काळिमा फासणारा आहे असा आरोप करून शंभर फुटी पुतळा उभारण्याची तुमची पात्रता नाही आम्ही लोक वर्गणीतून तो नक्कीच उभारू असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा महासंघाच्या माध्यमातून राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता सावंतवाडीच्या तहसीलदाराला निवेदन देण्यात येणार आहे तत्पूर्वी सावंतवाडी येथील राजवाडा येथे निषेध करून त्यानंतर सावंतवाडी तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत अभिषेक सावंत पुंडलिक दळवी मनोज घाटकर संजय लाड प्रसाद राऊळ आनंद गवस नंदू विचारे शिवा गावडे श्रीपाद सावंत राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी  आदी उपस्थित होते.