मनोज जरांगेंनी Manoj Jarange मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात त्यांनी काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी ते शांत झाले. मात्र लोकसभेत भाजपाला फटका बसला. त्यानंतर मनोज जरांगेंनी Manoj Jarange पुन्हा आंदोलन केलं. त्यांनी सरकारला सगेसोयऱ्यांच्या मागणीसह आरक्षण द्या अशी मागणी केली होती. त्यासाठी १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. आता तो संपल्यावर त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केलं आहे. तसंच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अमित शाह यांनी दिला होता आरक्षणाचा संदर्भ
राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील व गुंतागुंतीचा बनला असून भाजपाच्या अधिवेशनातही या प्रश्नावरुन खलबतं झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यानंतर, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा-ओबीसी आरक्षणावर चर्चा केलीय. मात्र, अमित शाह यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांच्यावर टीका करताना मराठा आरक्षणाचाही संदर्भ दिला होता.
मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका (What Manoj Jarange Said About Bhujbal?)
“आमच्याकडे रॅली काढून छगन भुजबळ १०० टक्के दंगली घडवून आणणार. मग, मी नाशिकमधील येवल्यात उपोषण सुरू केल्यावर, तुला किती वाईट वाटेल, माझ्या आता हे डोक्यातच आहे. तीन तीन वेळा उपोषण रॅली असतात का? तुझा जिल्हा मोकळा आहे, तू राजकारणासाठी मोकळा आहे, मी उपोषण करायला येवल्यात, नाशिकमध्ये कुठेही येऊ शकतो. माझं इकडं सुरू असलेलं उपोषण मी येवल्यात करू शकतो, थांब मी आता तिकडेच येतो” असा इशाराच मनोज जरांगेंनी Manoj Jarange भुजबळ यांना दिला आहे.
हे पण वाचा- Laxman Hake On Manoj Jarange : “मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना आणा”, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
अमित शाह यांच्यावर जरांगेंचा गंभीर आरोप
“अमित शाह आमच्या प्रश्नांकडे कशाला लक्ष घालतील? ते मोठे लोकं आहेत, त्यांना आमची गरज नाही. जे मोठे आहेत त्यांना हे धरुन राहणार आहेत. ते शिर्डीला आले तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं तुम्ही लक्ष घाला ते काहीही बोलले नाहीत. लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत, त्यांचा चेहरा माणसाचा आहे पण आतून कपटाने भरलेले लोक आहे. त्यांचं काही खरं नाही. ते गरीबाला कधीही मोठं करु शकत नाही. त्यांना देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे ती संपवायची आहे, पटेल मोठी जात आहे ती संपवायची आहे, यादव, गुर्जर, जाट, मुस्लीम, दलित या सगळ्या मोठ्या जाती त्यांना संपवायच्या आहेत. विचित्र लोक आहेत. छोट्या जातींना धरुन राजकारण करत आहेत. पण त्यांना माहीत नाही की मोठ्या जाती एकत्र आल्या तर काय होईल?” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd