मनोज जरांगे हे आजपासून शांतता रॅली सुरु करत आहेत. हिंगोलीतून ही रॅली सुरु होणार आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. १३ जुलैपर्यंतची मुदत त्यांनी सरकारला दिलेली आहे. आजपासून सुरु होणारी रॅली १३ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पुढची भूमिका स्पष्ट करतील. सकाळी ११.३० च्या वेळी शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. १३ जुलैपर्यंत विविध ठिकाणी ही शांतता रॅली काढली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे हिंगोलीकडे रवाना

मनोज जरांगे हे आता हिंगोलीतील शांतता रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह हिंगोलीला रवाना झाले आहेत. १० वाजण्याच्या सुमारास जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड या ठिकाणी सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या मदतीने ३० फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हाराने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहचतील आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यानंतर ११.३० वाजता शांतता रॅलीला सुरुवात होईल. दुपारी ३ वाजता शांतता रॅलीचा समारोप होईल त्यावेळी मनोज जरांगेंचं भाषण होईल. मनोज जरांगे पत्रकार परिषदही घेणार आहेत.

हे पण वाचा- मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या! काय आहे प्रकरण ?

८ जुलैला शिंदे समिती करणार हैदराबादचा दौरा

मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू होणार आहे. त्या आधीच सरकारच्या हालचाली वाढल्या असल्याचं चित्र आहे. ८ जुलैला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. चार दिवसांचा हा दौरा असणार आहे. त्यात मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत पुरावे जमा ही शिंदे समिती करणार आहे. एकूण आठजण या दौऱ्यावर जाणार आहे आणि मराठा कुणबी – कुणबी मराठा या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे सगळं हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जमा करण्यासाठी शिंदे समितीची हा दौरा आहे.

अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे खासदार संदीपान भुमेरही होते. अंतरवलीतल्या सरपंचांच्या घरी ही भेट झाली. यावेळी अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी जून महिन्यात उपोषणही सुरु केलं होतं. मात्र त्यावेळी शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. आता मनोज जरांगेंनी सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha leader manoj jarange shantata rally starts from hingoli today till july 13 for reservation scj
Show comments