मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम आहे, आम्ही जागरुक आहोत. माझी महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही १०० टक्के मतदान करा, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच मनोज जरांगेंनी ४ जूनसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगेंनी मराठा बांधवांनाही हे आवाहन केलं आहे मतदान करा. तसंच ज्याला पाडायचं आहे त्या उमेदवाराला पाडा. आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगेंनी?

“मराठवाडा, विदर्भातले बांधव मला भेटून गेले. आमची चर्चा झाली. ३ जूनला सगळे येणार आहेत. कारण ४ जूनपासून मी आमरण उपोषण करणार आहे. पाठिंबा, पाठबळ देण्यासाठी हे सगळे येत आहेत. मी लढणार आहे, जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी कठोर आमरण उपोषण करणार आहे. ४ जून ही तारीख त्यासाठी नक्की झाली आहे. तीन महिन्यांपूर्वीच ही तारीख नक्की झाली आहे. यामध्ये काहीही झालं तरीही बदल होणार नाही. माझ्या समाजाचा आग्रह आहे की मी उपोषण करु नये. मात्र मी उपोषणावर ठाम आहे. माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

तोपर्यंत मी शांत बसणार नाही

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मी राजकारणात पडणार नाही. मी कुठूनही उभा राहणार नाही. माझ्यामागे राजकारणाचा काही विषय ठेवू नका. निवडणुकीला उभा राहणार नाही. जर सगेसोयऱ्यांची अमलबजावणी केली नाही तर मात्र १०० टक्के मराठा समाज मैदानात उतरणार आहे. मी देखील मैदानात उतरणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

हे पण वाचा- “मला चाटून जाणारी गोळी…”, बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटलांचा इशारा

आमच्यावर गुन्हे दाखल करा किंवा..

मी जर चौथ्या टप्प्यात प्रचार केला तर संताजी-धनाजींसारखा पाण्यात का दिसायला लागलो? मी लातूर, धाराशिव, परभणी, जालना, संभाजीनगर, नाशिक सगळ्या ठिकाणी गेलो. मी काही कुणाला पाडाही म्हटलं नाही आणि आणाही म्हटलं नाही. माझा समाज मला वाऱ्यावर सोडत नाही. माझ्या समाजाला न्याय देण्याचं काम मी करतो आहे. मी माझ्या जिवाची बाजी लावली आहे. माझा मराठा समाजाला शब्द आहे की जीव गेला तरीही मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटत नाही, आमच्या आया बहिणींवर हल्ले करा, लाखो पोरांवर केसेस दाखल करा पण आता आम्ही मागे हटणार नाही. ज्यांना त्रास झाला ते पण जास्त ताकदीने आंदोलनावर ठाम आहेत. ४ जूनला तुम्हाला मराठ्यांची ताकद काय आहे ते समजेल असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत. आमचं शांततेचं युद्ध कुणीही रोखू शकत नाही. माझ्या समाजाला मी शांत राहा सांगितलं की कुणीही माझा शब्द मोडत नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. जे आम्हाला हिणवतील, अपमान करतील त्यांना आमचा समाज पाहून घेईल असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

काही लोक जातीपातीचं राजकारण करतात त्यांना आम्ही सुधारण्याची संधी दिली आहे

काही लोकांना सवय असते की ते जाती-पातीचंच राजकारण करतात. मात्र आमच्यासाठी तो विषय संपला. मी शांत आहे, आमचा समाज शांत आहे. आम्ही आता त्यांना सुधारण्याची संधी देत आहोत. असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आम्हाला सांगावं की आम्ही कुठे जातीवाद केला? मी एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही. नेत्यांना सोडत नाही, पण ते बोलल्याशिवाय मी बोलत नाही. समोरचा बोलला तर मी सोडत नाही. मी १३ मेपर्यंत चांगला होता, १४ मे पासून वाईट झालो असं म्हणत मनोज जरांगेंनी पोस्ट करणाऱ्यांना टोला लगावला.

Story img Loader