वाई:छगन भुजबळानां नायगावला येण्यास  विरोध नाही मात्र त्यांनी येऊन मराठा समाजाबाबत  वादग्रस्त वक्तव्य करू नये.नायगावात या पण बेताल बोलू नका अशी विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतींने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सांगली : जिल्ह्यात महिला अत्याचार, खूनाच्या घटनात वाढ

नायगाव येथे छगन भुजबळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा निमित्ताने येणार आहेत. दरवर्षी  ते उपस्थित रहात असतात आणि समाजबांधवानां मार्गदर्शन फरत असतात. त्याबददल आम्हाला काहीही हरकत नाही. परंतु यावर्षी त्यांनी मराठा आरक्षण विषयावर काही बोलून येथील समाजाचे वातावरण बिघडवू नये अन्यथा मराठा समाजाकडून काही प्रतिक्रिया आल्यास आम्ही मराठा आरक्षण संघर्ष समिती जबाबदार राहणार नाही. नायगावात या पण बेताल बोलू नका अशी विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाने  छगन भुजबळ यांना केली आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिदे, महिला जिल्हाध्यक्ष नमिता मोहिते, नीलेश भोसले, महेश चव्हाण, राहुल काळंगे यांच्या सह्या आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९३ वा जयंती सोहळा बुधवार (दि३)  रोजी महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नायगाव (ता खंडाळा) येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा  मंत्री छगन भुजबळ, आमदार मकरंद पाटील   उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी वादग्रस्त व्यक्त करू नये अशी विनंती मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.