प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. परळ या ठिकाणी असलेल्या क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे लोक एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत होते. गुणरत्न सदावर्ते सतत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेत होते. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्याच रागातून ही तोडफोड झाली असावी अशी शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांततापूर्ण आंदोलनाची व्याख्या आहे का? असा प्रश्न सदावर्ते यांनी या प्रकारानंतर विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंसेचं समर्थन नाही-जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसंच मला कुणीही शांत करु शकत नाही असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तर आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्यांनी गडी फोडली त्यांच्या भावनेचा आदर

मात्र गुणरत्न सदावर्तेंची कार ज्यांनी फोडली त्यांनी भावनेच्या भरात हे कृत्य केलं असेल आम्ही त्यांच्या भावनेचा आदर करतो असं वक्तव्य अमोल जाधवराव यांनी म्हटलं आहे. गुणरत्न सदावर्ते हे सातत्याने मराठा समाजाविषयी गरळ ओकत असतात. गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाविषयी क्लेशवाचक वक्तव्य का करतात असाही प्रश्न जाधवराव यांनी विचारला. तसंच ज्यांनी तोडफोड केली ते तुरण मराठा समाजाचे नव्हते असंही जाधवराव यांनी म्हटलं आहे.

गुणरत्न सदावर्तेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही

गुणरत्न सदावर्ते यांची कार ज्यांनी फोडली त्यांचं आम्ही समर्थन करतो. कोणावरही गुन्हा दाखल करु नये. गुणरत्न सदावर्ते यांनी कायम मराठ्यांविरोधात गरळ ओकली आहे. सदावर्तेंचा बोलवता धनी कोण आहे हो आहे हे आम्हाला ठाऊक आहे असं मराठा समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी म्हटलं आहे आणि फोडाफोडीचं समर्थन केलं आहे. तसंच सदावर्तेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असंही म्हटलं आहे.

“माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईचं नुकसान”

“माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईचं त्यांनी नुकसान केलं आहे. त्यांनी यापूर्वी ३२ कर्मचाऱ्यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या,” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha morcha not involved in gunaratna sadavarte car vandalize case but we are proud of them said amol jadhavrao scj
First published on: 26-10-2023 at 14:13 IST