सोलापूर : सोलापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेल्या आंदोलन चांगलेले धुमसत असताना शहराजवळील तळे हिप्परगे येथे मराठा आंदोलकांनी जिवंत प्रेत चितेवर ठेवून शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. शासनाला मराठा आरक्षणावियी संवेदनशीलता नसेल तर मुंबईत विधानभवन आणि मंत्रालयासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दारासमोर चिता पेटविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर श्याण्णवकुळी मराठा कार्यकर्त्याची तर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ‘पंडित’ आडनावाच्या कार्यकर्त्याची चिता पेटवू, असा इशारा तळे हिप्परगा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा >>> संचारबंदी मागे; आंदोलन शांततेत आठव्या दिवशी विविध संघटनांचा सहभाग, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

मराठा आंदोलनाची तीव्रता कायम असताना सोलापूरजवळ तुळजापूर रस्त्यावर तळे हिप्परगा गावात एका तरूणाच्या जिवंत प्रेताची अंत्ययात्रा काढण्यात आली. हलग्यांचा कडकडाट, वारकरी भजनी मंडळाचे टाळमृदुंगाच्या निनादात भजन, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिंकू किंवा मरू, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा गावभर फिरून एका मैदानावर पोहोचली. तेथे लाकडाची चिता रचण्यात आली होती. जिवंत प्रेतावर रीतरिवाजाप्रमाणे विधी पूर्ण करून चितेवर जिवंत प्रेत ठेवण्यात आले होते. हे आंदोलन सुमारे तासभार सुरू असताना पोलीस तेथे पोहोचले नव्हते.