मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जालन्यात मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. राज्यातही ठिकठिकाणी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. शनिवारी ( ९ सप्टेंबर ) काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जरांगे-पाटलांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात उपोषण आणि आंदोलन सुरू आहेत. नांदेडमधील धर्माबाद तालुक्यात सकल मराठा समाजाचं उपोषण सुरू आहे. अशातच काँग्रेसच्या वतीनं माहेश्वर भनव येथे काँग्रेसच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली.

हेही वाचा : वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय

बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळाच्या बाहेर पडले. त्यावेळी संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून अशोक चव्हाण यांना घेराव घातला. काँग्रेसची बैठक का घेतली? मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना काय केलं? असे प्रश्न कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांना विचारले.

“मराठा समाजाचा असताना धर्मादाबादमध्ये सभा घेण्याची गरज नव्हती. त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो,” असं एका समाजाच्या मराठा कार्यकर्त्यानं म्हटलं.

हेही वाचा : मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून जरांगेंचे आंदोलन तीव्र

त्यावर, “मी तुमचा निषेध करतो. तू मला सांगू नको”, असं अशोक चव्हाण म्हणाले. यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांचा रोष पाहून अशोक चव्हाण पोलीस बंदोबस्तात निघून गेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation activist angry ashok chavan in nanded dharmabad congress meeting ssa