बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. मराठ्यांवर दबाव टाकणं सोप्पं नाही, असा इशाराही जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.”

Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!
ayushman bharat yojana
अन्वयार्थ : हा अट्टहास कशासाठी?
Opposition from the State Public Works Department Contractors Association to the Governor Chief Minister Deputy Chief Ministers regarding the payment of arrears Nagpur news
मुख्यमंत्री, उपमख्यमंत्र्यांना काळी पणती, काळे आकाश कंदील पाठवणार

हेही वाचा : “आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो, खूप दिवस झालं तुझी…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचा भुजबळांना इशारा

“शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू. पण, कोण कुठं बसेल माहिती नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू. मात्र, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

“आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. फक्त शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे चला. शांततेची धूळ जरी उडाली, तरी सरकार मुंबईत राहणार नाही. सगळे आपल्या गावी येणार,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.