मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सरू केलं आहे. राज्यभरातील मराठा समाजही आक्रमक झाला असून अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, संतप्त मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या वाहनांना आगही लावली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमदार प्रकाश सोळंके हे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत, हा राग मनात धरून ३००-४०० मराठा आंदोलकांनी त्यांच्या घरावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आंदोलकांनी सोळंके यांच्या घरावर प्रचंड दगडफेक केली आहे. तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून सर्व वाहनं जाळली आहेत. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव काहीही ऐकून घ्यायला तयार नसल्याचं दिसलं.

हेही वाचा- शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीड येथील निवासस्थानावर मराठा आरक्षण आंदोलकांनी हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, “हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आगीमुळे मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे.”