Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळू लागला असून राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनि परब, शेकापचे जयंत पाटील आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला आहे.

काय आहे या ठरावामध्ये?

या बैठकीमध्ये ठरलेल्या मुद्द्यांवर आधारित एक संयुक्त ठराव तयार करण्यात आला असून त्यावर उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी सह्यादेखील केल्या आहेत. या ठरावामध्ये आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम

“मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचं एकमत आहे. यासाठीच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं. त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यत तो वेळ देणं गरजें आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्याच कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन करण्यात यते आहे. तसेच, या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे”, असा हा ठराव आहे.

“फडणवीसांनी चर्चेला यावं, मराठे संरक्षण देतील”, सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेंचं खुलं आव्हान, म्हणाले…

ठरावावर कुणाच्या सह्या?

या ठरावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप), सुनील प्रभू, सुनील तटकरे, प्रशांत इंगळे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश टोपे, कपिल पाटील, प्रमोद पाटील, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, रेखा ठाकूर, सुचेता कुंभारे, राजेंद्र गवई, गौतम सोनावणे, सचिन खरात, रवी राणा, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, गिरीश महाजन, संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्या सह्या दिसत आहेत.