छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट होणार होती. मात्र, ही भेट रद्द झाली आहे. ‘माझी काही नियोजित ठरलेली कामे असल्याने मला त्यांना भेटता येणार नाही. या गोष्टीचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये. येत्या दोन-चार दिवसांत आमची भेट होईल. या भेटीनंतर आम्ही आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ,” असं उदयनराजेंनी सातारा येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ते भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेणार होते. यासंदर्भात आज (११ जून) साताऱ्यात उदयनराजेंनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी उदयनराजे म्हणाले, “संभाजीराजे हे माझे भाऊ असून, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यासोबत आहे. येत्या दोन-चार दिवसांत आमची भेट होईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा- संभाजीराजेंनी याचा विचार करावा; चंद्रकांत पाटलांनी दिला सावधगिरीचा इशारा
कोल्हापूर येथे भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची भूमिका काल (१० जून) स्पष्ट केली. यावेळी त्यांनी या आंदोलनासाठी आपण खासदार उदयनराजे भोसले यांचीही भेट घेणार, असं नमूद केलं होतं. त्यामुळे संभाजीराजे व उदयनराजेंच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या दोन नेत्यांची पुण्यात भेट होऊन आंदोलनासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र, काही कारणास्तव खासदार उदयनराजे भोसले आज पुण्याला गेले नाहीत. त्यामुळे त्यांची भेट कधी होणार याविषयीची उत्सुकता ताणली होती. मात्र आज जलमंदिर पॅलेस येथे पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी आपली बाजू स्पष्ट केली.
Maratha Reservation: “संभाजीराजे माझे बंधू आहेत, त्यांनी कधीही यावं”; उदयनराजेंचं मोठं विधान https://t.co/41mx5qT8KA < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #MarathaReservation #SambhajirajeBhosale #UdayanrajeBhosale @Chh_Udayanraje @YuvrajSambhaji pic.twitter.com/BAK0DcPKps
— LoksattaLive (@LoksattaLive) June 11, 2021
खासदार उदयनराजे म्हणाले, “संभाजीराजे माझे भाऊ आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे. माझी काही नियोजित ठरलेली कामे असल्याने मला त्यांना भेटता येणार नाही. या गोष्टीचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये. येत्या दोन चार दिवसांत आमची भेट होईल. या भेटीनंतर आम्ही आरक्षण आंदोलनाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ,” असे उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.