नगरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या, गुरुवारी शिर्डी येथे होणाऱ्या सभेत त्यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेचा ठाकरे गट व संभाजी ब्रिगेड त्यांना सभेत घुसून जाब विचारणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर केली नाही तर सभेत उपस्थित असलेले ५ हजार कार्यकर्ते सभेत एकाचवेळी उभे राहतील व जाब विचारतील असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या शिर्डीत सभा होत आहे. त्यांच्या उपस्थितीत विविध प्रकल्पांचे उद्घाटने, भूमिपूजने होणार आहेत. यानिमित्ताने शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी किमान १ लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहावे यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
shiv sena leader aditya thackeray hit bjp for favouring gujarat in loksatta loksamvad event
गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व ठाकरे गटाने भूमिका जाहीर केली आहे. यासाठी जिल्ह्यात मराठा समाजाच्या ५ हजार कार्यकर्त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ते सभेत सुरुवातीपासून उपस्थित राहतील. मोदींचे भाषण ऐकतील. काही वेळानंतर जर पंतप्रधानांनी मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर केली नाही तर ते सर्वजण एकाच वेळी उठून उभे राहतील व जाब विचारतील, असे सावंत व जाधव यांनी सांगितले.

काल, मंगळवारी जामखेड (नगर) येथे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पंतप्रधानांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित राहून आपण ही भूमिका खासदार विखे यांना सांगितली, त्यावर त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधानांच्या कानावर घातला जाईल असे आश्वासन दिले आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

आम्हाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण हवे आहे. परंतु सध्याच्या व पूर्वीच्याही सत्ताधाऱ्यांची आरक्षण देण्याची राजकीय मानसिकता नाही. सर्व सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत मराठ्यांची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे, अशा काळातच शिक्षण व नोकरीचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय सध्याच्या सरकारने घेतला. अखेर त्यांचा हा निर्णय चुकल्याचे लक्षात आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी त्याची जबाबदारी पुर्वीच्या सरकारवर ढकलली, मात्र पूर्वीच्या सरकारमध्ये असलेल्या कोणत्याही मंत्र्याने किंवा फडणवीस यांनी विरोध केला नव्हता याकडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे जरी मराठ्यांना कुणबी आरक्षण नको आहे अशी भूमिका घेत असले तरी राणे यांच्या मुलाची सासुरवाडी नगर जिल्ह्यातील आहे, त्यांनी कुणबी आरक्षण मिळवले आहे, असाही दावा सावंत यांनी केला. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे उपस्थित होते.

छाया ओळी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या, गुरुवारी शिर्डीत होणाऱ्या सभेत मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव, ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे व मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केली.