मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. तिकडे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावर आघाडी सरकार गंभीर नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारने मराठा समाजाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाचा वापर केवळ सत्ता मिळविण्यासाठी खतासारखा केला जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.”

“मराठा आरक्षणावर हे महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. हे वारंवार स्पष्ट होताना आपल्याला दिसतय. मराठा समजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर या सरकारने एकही निर्णय, एकही गोष्ट मराठा समाजासाठी केलेली नाही, ही वस्तूस्थिती आहे.” असं विनायक मेटे म्हणाले आहेत.

तसेच, “जे जे या चळवळीत आरक्षणासाठी आंदोलन करतात, त्या सगळ्यांबरोबर बोलणं चर्चा करणं, या देखील साध्या प्राथमिक गोष्टी हे सरकार करत नाही. मराठा यांना काही देणंघेणं नाही. फक्त सत्ता मिळवण्यासाठी खतासारखा उपयोग हे सरकार मराठा समाजाचा करतय, हे आपल्या चित्र दिसतय.” असा आरोपही विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

Story img Loader