वाई : ओबीसींचे आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही. हजारो वर्षाचे सामाजिक मागासलेपणा दुर करण्यासाठी आहे. कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने आमच्या आरक्षणात त्यांना वाटेकरू होऊ देणार नाही. आमचा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसी मधून आम्ही देऊ देणार नाही, असे मत मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले.

वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून हाके बोलत होते. यावेळी पुणे येथील माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे – पाटील, ऑल इंडिया मुस्लिम समाज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुल सुतार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

प्रा. हाके पुढे म्हणाले,छगन भुजबळ हे ओबीसींचा आवाज असून त्यांना पद्धतशीरपणे टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची एकी दाखवण्याची ही वेळ आहे. ओबीसी मध्ये ४५० जाती आहेत. जातनिहाय जनगणना करा आम्ही ६० टक्केच्या वरती आहोत. सर्व सत्तास्थाने कारखाने डीसीसी बँक तुमच्या ताब्यात असताना तुमचा समाज मागास कसा यामुळेच सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले होते. ३.५ लाख करोडचे महाराष्ट्राचे बजेट आहे. त्यातील ओबीसींसाठी केवळ ०.६ टक्के बजेटची तरतूद केवळ ओबीसींच्या विकासासाठी केली जाते. हे वास्तव तुम्ही जनतेसमोर का मांडत नाही. कुणबी दाखले मिळूवून आमचे राजकीय आरक्षण हडपण्याचा डाव राजकीय मंडळींनी आखला आहे. कायदे करणाऱ्या सभागृहांमध्ये आमचे नेते किती याचा विचार समाजाने करावा. हे आरक्षण गेले तर पुन्हा अडीचशे वर्षे मागे जाऊन आपण गुलामगिरीने जगायचे काय याचाही विचार समाजाने करणे गरजेचे आहे.

पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका रूपालीताई ठोंबरे म्हणाल्या, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसी कोट्याला धक्का न लावता ते देण्यात यावे, यावर आम्ही ठाम आहोत असे मत व्यक्त केले.यावेळी अब्दुल सुतार, भारत लोकरे, अशोक गायकवाड यांची भाषणे झाली.