Maharashtra Live updates 2023: नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेला अंतर्गत कलह आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना आपली नाराजी पत्राद्वारे कळवली असून. विधीमंडळ पक्षनेते पद सोडण्याचा आपला निर्णयही कळवला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी बोलावले आहे. या बैठकीत या कलहावर तोडगा निघणार का? या कडे राज्य काँग्रेसचे वेध लागले आहे.
कसबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पुण्यातील कसबा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करुन सोडणारी घटना घडली आहे. बारांबकी जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेच्या (शहर) अनुदानाचा ५० हजारांचा पहिला हप्ता मिळाला आणि चार महिलांनी घर सोडून थेट प्रियकरासोबत पोबारा केला. चार महिलांनी अशाप्रकारे पतीला सोडून प्रियकारासोबत पळ काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पैसे घेऊन पत्नी पळल्यामुळे पतीचे मात्र आर्थिक नुकसान झालेच, त्याशिवाय गावात चर्चा झाली. त्यामुळे या चारही प्रकरणातील पतींनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. वाचा सविस्तर वृत्त
दुर्लक्षित केल्याची भावना सहकार गटात असतानाच शरद पवार यांचा दौरा सर्वच एकजुटीने यशस्वी करतील असा दावा, माजी खासदार सुबोध मोहिते यांनी केला आहे. सर्वच नेते आपल्या कार्यकर्त्यांसह साहेबांचा दौरा फत्ते करून दाखवतील, अशी खात्री मोहिते यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना दिली.
घोषित करण्यात आलेले व्यपगत (लॅप्स) प्रकल्प मार्गी लावून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अखेर महारेराने पुढाकार घेतला आहे. यासाठी विकासकांच्या सहा स्वयं विनियामक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.
क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू, तंत्रशुद्ध शैली, संयम व समतोलपणा, मेहनत, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती अंगी बाणणारे खेळाडू, अनेक पुरस्कार, सन्मान ज्यांच्या वाट्याला आले असे सर्वांचे लाडके ‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर.
बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, विचारांची देवाणघेवाण करणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब करून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
राज्य सरकारने महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी स्तन कर्करोग उपाययोजना आणि जनजागृती, मौखिक आरोग्य, थायरॉईडबाबत अभियान राबविण्यात येणार आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाने ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला धडा शिकवण्यासाठी हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आता आनंद दवे यांनी थेट राज ठाकरे यांनाच ऑफर देत मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल, अशी थेट ऑफर दिली आहे. तत्पूर्वी राज ठाकरे ठाकरे यांनी कुणाचाही प्रचार करु नये, असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले होते. पण राज ठाकरे आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत, त्यामुळे मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी दवे यांनी केली.
शहरात भरदिवसा कोयता गँगने माजविलेली दहशत, तसेच गंभीर गुन्हे रोखण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दररोज सायंकाळी तीन तास पायी गस्त घालण्याची योजना सुरू झाली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, असे चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. महाविकास आघाडीचे माझ्यासमोर क्षुल्लक आव्हान आहे. गेल्या तीस वर्षांपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता असल्याने माझा विजय नक्की होईक, असा विश्वास भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या भागातून वाहन चालक वाहने हळू चालवित असल्याने वाहन कोंडी होते. वाहतूक विभागाने पालिका बांधकाम विभागाला वर्दळीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करुन घ्यावेत म्हणून मागणी केली आहे.
बारामतीमधील विकास किंवा पवार कुटुबियांच्या नावे भाजपची मंडळी नाके मुरडत असली तरी वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कृषी प्रदर्शन आयोजित करण्याच्या उद्देशाने बारामतीमधील पवारांच्या संस्थेची पाहणी केली.
पुणे शहरातील शाळकरी मुलांमध्ये सध्या ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढत असून, या पार्श्वभूमीवर पालकांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. ॲडिनोव्हायरस नावाच्या एका विषाणूमुळे सध्या शहरातील मुलांमध्ये हा संसर्ग दिसून येत असून, हा विषाणू श्वसनसंस्था, आतडी, डोळे आणि मूत्रमार्गाच्या अस्तरावर वाढतो.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जनहित आणि देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. शिवाय वैयक्तिक हितापेक्षा जनहित महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे नमूद करून प्रकल्पासाठी गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीची जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी योग्य ठरवला.
गेल्या वर्षी मनसे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर लावण्यात येणारे लाऊडस्पीकर आणि त्यावर चालणारी अजान याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून मंदिरांवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्याचंही आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतं. आता या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. वाचा सविस्तर वृत्त
येत्या काळात नोकरदार महिलांसाठी मुंबईत सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. याकरिता एकूण २१ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
स्थानिक आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू करण्यात प्रशासनाला यश आले. आता या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून, याच टेकडीवर पुन्हा ६ नव्या खाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच निविदा मागवण्यात आल्याने पुन्हा एकदा खाणविरोधी आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारे शंभरहून अधिक जुना आणि जीर्ण झालेला अजनी रेल्वे पूल तोडण्यात येणार असून त्याऐवजी उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेच्या जागेवरील आणि पुलाच्या शेजारी असलेल्या २७ दुकानांवर बुधवारी बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्यात आले.
एका वाहनाला धडकल्याने फेकल्या गेलेल्या दुचाकीस्वार महिलेचा मागून भरधाव आलेल्या बसखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना धंतोली पोलीस ठाण्याअंतर्गत काँग्रेसनगर येथे बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
रेशीमबाग मैदानात नागपूर मेगा ट्रेड फेअर हॅन्डलूम हॅन्डीक्राफ्ट एग्जिबिशन ॲन्ड ॲम्युजमेन्ट पार्कच्या नावावर मोठे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनीतील वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल झुल्यांनी नागरिकांना भुरळ घातली असून त्यावर मोठी गर्दी जमत आहे.
आजही जगात जिवाणू-विषाणूच्या संक्रमणाने होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्या जिवाणू-विषाणूची कुणालाही माहिती नाही. या अनोळखी जिवाणू- विषाणूचा उपराजधानीतील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (सिम्स) अभ्यास होणार आहे.
जामठ्यात गुरुवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नागपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. जवळपास ३ हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच क्रिकेट सामना बघायला गर्दी उसळणार असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ९ मार्चला अर्थसंकल्पीय अधिसभेच्या बैठकीचे आयोजन करून पुन्हा दडपशाही सुरू केल्याचा आरोप होत आहे. अधिसभेच्या पदवीधर गटाची निवडणूक १९ मार्च व मतमोजणी २१ मार्चला होणार आहे.
मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपूलाचे आज दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ क्रिकेट एसोसिएशनच्या मैदानावर नागपूर येथे खेळला जाणार आहे. खेळाडूंची आणि मैदानावरील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सशस्त्र जवानाच्या तुकड्यांसह साध्या वेशातील पोलिसांचा ताफासुद्धा सज्ज आहे. वाचा सविस्तर वृत्त
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने भारतासाठी अतिशय महत्त्वाची असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका आज, गुरुवारपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे, असे असताना टीम इंडियात कोणाचे सिलेक्शन होणार यावरून प्रचंड गोंधळ दिसत आहे. अशातच तीन दिग्गज प्लेअरनी त्यांच्या त्यांच्या टीम बनवून हे कन्फ्यूजन आणखी वाढविले आहे. वाचा सविस्तर वृत्त