Maharashtra mlc election result 2023, Maharashtra updates : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याशिवाय औरंगाबाद येथील जागाही अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडेच गेली आहे. तर अमरावतीमध्येही लांबलेला निकाल अखेर महाविकास आघाडीच्याच बाजून लागला. या ठिकाणी धीरज लिंगाडे विजयी झाले त्यांनी भाजपाच्या रणजित पाटील यांचा पराभव केला. नाशिकमधील विजयानतंर आता सत्यजित तांबे पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

यासह राज्यभरातील विविध महत्त्वपूर्ण घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचा केवळ एकाच क्लिकवर

Live Updates

Maharashtra News Updates: राज्यभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षिणक आदी विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एकाच क्लिकरवर.

12:27 (IST) 3 Feb 2023
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी, आजोबा दिवस; शासनाचे परिपत्रक जारी

शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी, आजोबांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी, आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी, आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 3 Feb 2023
कल्याण-मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला गती; रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी अंतिम मंजुरी

बहुप्रतिक्षित कल्याण मुरबाड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली असून लवकरच या कामासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 3 Feb 2023
पुणे: मनसेचे माजी माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश माझिरे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 3 Feb 2023
पुणे: राज्यसेवेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींचे पुण्यात आंदोलन सुरू

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाला आंदोलक स्पर्धा परीक्षार्थींनी समर्थन देत घोषणाबाजीही केली.

सविस्तर वाचा

12:08 (IST) 3 Feb 2023
नागपूर : ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नवीन नर्सिंग महाविद्यालय!, अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे आशा पल्लवित

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारच्या (१ फेब्रुवारी २०२३) अर्थसंकल्पात २०१४ पासून स्थापन १५७ वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहस्थानांवर नवीन नर्सिंग महाविद्यालयांची घोषणा केली.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 3 Feb 2023
माघी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मलंग गडावर

कल्याण जवळील मलंग गडावर माघी पौर्णिमेनिमित्त मोठा जत्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम होतात. या उत्सवांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी सकाळी साडे आठ वाजता मलंगगडावर येऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आरती, दर्शन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 3 Feb 2023
MLC Election 2023: अमरावती पदवीधर मतदार संघात ‘त्‍या’ अवैध मतांचे गूढ काय?

मतमोजणी केंद्राबाहेर काल सकाळपासूनच डॉ. रणजित पाटील आणि धीरज लिंगाडे यांच्‍या समर्थकांची गर्दी होती. सायंकाळपर्यंत धीरज लिंगाडे हे सुमारे दोन हजार मतांची आघाडी टिकवून असल्‍याने भाजपा कार्यकर्त्‍यांची गर्दी कमी झाली.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 3 Feb 2023
MLC Election : अमरावती पदवीधर मतदार संघात बाद फेरीची मतमोजणी सुरूच; निकालास विलंब, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

मतमोजणीच्‍या चोवीस तासांच्‍या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्‍या. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्‍त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्‍यावेळी २ हजार ३१३ मतांची होती.

सविस्तर वाचा

11:08 (IST) 3 Feb 2023
MLC Election 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघातील निकाल का रखडला?

अमरावती पदवीधर मतदार संघात एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. नोंदणी झालेल्‍या २ लाख ६ हजार १७२ मतदारांपैकी ४९.७५ टक्‍के मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. गुरूवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. मतमोजणीची गती संथ होती.

सविस्तर वाचा

11:05 (IST) 3 Feb 2023
“आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं, की…” नागपूरमधील पराभवानंतर फडणवीसांचं मोठं विधान!

नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत या जागेसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:03 (IST) 3 Feb 2023
MLC Election : निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत आणि नंतरही राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांना भावना अनावर झाल्याचेही दिसून आले. वाचा सविस्तर बातमी…

10:55 (IST) 3 Feb 2023
विधान परिषदेत भाजपला धक्का; नागपूरची हक्काची जागा गमावली, महाविकास आघाडीचे वर्चस्व

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:54 (IST) 3 Feb 2023
MLC Election Result: पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे विजयी, मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव

Nashik Graduate Constituency Election Result: नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती. पण पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:53 (IST) 3 Feb 2023
“दिल्लीस मान्य नाही म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या चरणी अर्पण करणे कितपत योग्य?” ठाकरे गटाचा सवाल!

कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. राज्यगीतावेळी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र यावरून शिवसेनेने(ठाकरे गट) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…

नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत या जागेसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.