मराठी दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी नागपुरात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नागराज मंजुळे आपल्या ‘झुंड’ चित्रपटामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत होते. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त यश मिळवू शकला नसला तरी मात्र समीक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे. यानिमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे.

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात नागपुरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना संधी देण्यात आली. तसंच चित्रपटाची कथादेखील नागपुरभोवतीच आहे. यानिमित्तानेच आभार मानण्यासाठी नागराज मंजुळे नागपुरात आले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नागराज मंजुळे यांनी सांगितलं की, “आम्ही शूट केलं तेव्हा त्यांची भेट होऊ शकली नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी फार मदत केली होती त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो. नागपुरात आल्याने ही सदिच्छा भेट आहे”.

नागराज मंजुळे यांचा चित्रपट विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित असून स्पर्धेसाठी प्रायोजक मिळत नाही आहेत. यासंबंधी विचारलं असता नागराज मंजुळे यांनी आपल्याला हा विषय माहिती नाही. पण मदत केली पाहिजे असं म्हटलं.

Story img Loader