Mumbai Maharashtra Today: राज्यात सध्या सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन पक्षांमधील आमदार अपात्रतेच्या प्रकरणांची जोरदार चर्चा आहे. एकीकडे शिवसेनेतील सत्ताधारी शिंदे गट व विरोधातील ठाकरे गट यांच्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गट व विरोधातील शरद पवार गट यांच्यातील पक्षनाव व चिन्हाचा तिढा निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आहे.
News in Marathi: आमदार अपात्रतेच्या मुद्द्याचं काय होणार?
डोंबिवली: येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट मध्ये सामान खरेदीसाठी आलेल्या एका ४५ वर्षाच्या महिलेने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अंगावरील कपड्यांमध्ये २२ हजार रुपयाहून अधिक किमतीचा माल चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.
वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रुपाली चाकणकर यांची खोचक पोस्ट...
एखादी व्यक्ती आपल्या सोबत असली की त्याची किंमत कळत नाही परंतु ती व्यक्ती आपल्यातून दूर निघून गेली की त्याचं असणं आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या राजकीय भवितव्यासाठी किंवा एखाद्या पुरस्कारासाठी किती महत्वाचं असतं, हे प्रकर्षाने जाणवतं. काही जणांच्या मनाची अवस्था अगदी अशीच झाली आहे , सोबत असताना कधी नाराजीची जाणीव झाली नाही पण आता ती व्यक्ती आपल्या सोबत नसल्यावर अर्धवट माहितीच्या आधारावर कोणत्यातरी 'सूत्रांच्या' हवाल्याने वक्तव्य हे खरं म्हणजे प्रचंड आगतिकतेची आपण शिकार झाला आहात याची मनोमन खात्री पटते.
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1709482484189298956
ग्रहणातील सूर्यकिरणांइतका घातक असलेल्या लेझर प्रकाशझोताच्या सार्वजनिक वापरावर बंदी घालण्याची किंवा त्याच्या वापराबाबत काही नियम घालण्याची आवश्यकता वैद्यकीय क्षेत्रातील नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महाऔष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉटचे कालबाह्य झालेले १ व २ क्रमांकाचे संच पाडण्यात येऊन जागा मोकळी करण्यात आली. ही प्रक्रिया वीज केंद्राच्या वतीने बुधवारी पूर्ण करण्यात आली.
चंद्रपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीसुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
नवी मुंबई: अनधिकृत फेरुवाल्यांनी कारवाई करणाऱ्यांवरच दादागिरी केली. त्यांच्याशी झटपटही केली. याचे मोबाईल चित्रण सध्या व्हायरल होत असून अनधिकृत फेरीवाल्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीतील सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनींसाठी शहरात वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे.
परिसर व शौचालयाची दूरवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. या दौऱ्याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल उपस्थित होते.
खासदार हेमंत पाटील यांच्या गैरवर्तणुकीबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केल्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
जलवाहिन्यांना वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते आणि शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.
कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न घातल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार त्यासाठी कंपनी मालकाला दोषी धरण्यात येणार आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे मुसलमानांची संख्या वाढत असल्याचे विधान करत चिंता व्यक्त केली होती.
संशयीतांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.
वाशीम : भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते. भाषणे केल्याने पक्ष वाढत नाही. जर तसे असते तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची बनली असताना त्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे. अनेकदा मंत्रिपद किंवा अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असले तरी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हुलकावणी देत असल्याची हुरहूर त्यांना होती.
नागपूर: हत्येप्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेच्या काळात तो पॅरोलवर बाहेर आला आणि नंतर तो कारागृहात परतलाच नाही. तब्बल १२ वर्षे तो फरार होता. मात्र अचानक त्याने आत्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी.
नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत जाहीर होईल हे मला माहिती नाही. मी त्या चर्चेत नाही. याचं चांगलं उत्तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीच देऊ शकतील. माझी इच्छा काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार आमचे आहेत. सहा आमदार आहेत. सातवे खोसकरही आमचेच आहेत. त्यामुळे तिथे पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे. रायगडच्या बाबतीतही आमचे आमदार मंत्री आहेतच. पण आमचे खासदार आहेत. कोकण विभागात एक तरी जिल्हा आम्हाला हवाय ही आमची भूमिका आहे. आता त्यावर काय तोडगा निघतो बघू - भुजबळ
माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकूण जरा आश्चर्यच वाटलं - रोहित पवार
जिल्ह्याचा दादा कोण यावरून चंद्रकांत पाटील आणि उपमु़ख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असतानाच अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
रूग्णालय रुग्ण मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयानं घेतली दखल. गुरुवारी होणार तातडीची सुनावणी
काही आठवड्यांपूर्वी ठाणे (बेकायदा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ) आणि गेल्या तीन दिवसांत नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणाऱ्या एका राज्यात एका सरकारी रुग्णालयात फक्त ऑक्सिजन किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्ण मरण पावतात याची कल्पनाही करवत नाही. त्याहून वाईट म्हणजे राज्य सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षमतेमुळे नवजात बालकांचा यामुळे मृत्यू व्हावा.
हे सगळं घडत असताना आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी गेले. पण त्यांनी या शहरांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेट दिली नाही.
जर मी मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱ्याचा किंवा त्यांच्या सुट्टीचा मुद्दा उपस्थित केला नसता, तर आत्ता या घडीला ते बाहेर सुट्टीवर असते.
आज ते पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात व्यग्र आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ते वाद घालत होते. पण या राष्ट्रीय आपत्तीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
हे अवमानकारक आणि धक्कादायक आहे. पण मिंधे व भाजपाच्या अकार्यक्षम, घटनाविरोधी व हुकुमशाही वृत्तीच्या सरकारला हे साजेसंच आहे.
मी राज्य सरकारला मुंबई महानगर पालिकेच्या व राज्य सरकारच्या मुंबईतील रुग्णालयांतल्या परिस्थितीविषयी २९ सप्टेंबर रोजीच राज्य सरकारला लेखी कळवलं आहे. अशी परिस्थिती पुन्हा ओढवू शकते असा इशाराही दिला आहे.
आता हे महाराष्ट्रविरोधी अकार्यक्षम सरकार चालवण्याची मुख्यमंत्र्यांना थोडी तरी शरम वाटेल का? ते आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेतील का? या सगळ्या पार्श्वभूमीवर ते स्वत: राजीनामा देतील का?
चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे महात्मा गांधी यांची त्याग व बलिदानाची गाथा साता समुद्रपार पोहोचली असून अनेक देशातील महत्त्वकांक्षी लोक गांधी विचार रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, देशातील सत्याधाऱ्यांकडून महात्मा गांधींना बदनाम करून त्यांच्या मारेकऱ्यांना ‘थोर नायक’ ठरवित धर्मांधता व जातीय भेदाचे राजकारण करून अराजकता माजविण्याचे काम सुरू आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कदाचित अद्याप झाला नसावा. उदय सामंतांकडे अर्थात रायगडचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच आहे. त्यामुळे तशी अडचणीची काही बाब नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आमची धावपळ चालू आहे. पण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीपदाबाबत त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतील - भरत गोगावले
फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन होत नसतानाही फिरत्या हौदाची सुविधा देण्याचा घाट महापालिकेने घातल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी फिरत्या हौदांमध्ये १३ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा त्याहीपेक्षा कमी केवळ १०.५ टक्के मूर्तींचे विसर्जन झाले.
वाशिम : सरकारने मला दिव्यांग मंत्रालय खाते दिले. मात्र, हे खाते केवळ नावापुरतेच शिल्लक आहे. ना कुठली गाडी, ना घोडी, ना कोणतेही अधिकार. मात्र समाधान याचे आहे. की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या अडचणी समजून घेऊन येणाऱ्या काळात दिव्यांगाचे दुःख कमी करून तुमच्यासाठी लढत राहील, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी केले.
मी जर मुख्यमंत्र्यांच्या विदेश दौऱ्याचा मुद्दा उपस्थित केला नसता, तर आत्ता ते विदेशात सुट्टीवर असते - आदित्य ठाकरे
बदललेल्या पालकमंत्र्यांच्या नावांची यादी मुख्यमंत्र्यांनी एक्सवर केली पोस्ट
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1709482937488723981
नागपूर: आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (४ ऑक्टोंबर) नागपुरातील संविधान चौकात आदिवासी समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी आदिवासी महिलांनी अचानक घरकुलाच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडवल्याने तणाव निर्माण झाला होता.
News in Marathi: सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन्ही पक्षांमधील वादांवर सुनावणी!