Mumbai Maharashtra Today: राज्यात सध्या सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन पक्षांमधील आमदार अपात्रतेच्या प्रकरणांची जोरदार चर्चा आहे. एकीकडे शिवसेनेतील सत्ताधारी शिंदे गट व विरोधातील ठाकरे गट यांच्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गट व विरोधातील शरद पवार गट यांच्यातील पक्षनाव व चिन्हाचा तिढा निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आहे.

Live Updates

News in Marathi: आमदार अपात्रतेच्या मुद्द्याचं काय होणार?

14:34 (IST) 4 Oct 2023
डोंबिवलीतील ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार? चालकांनी थकवली ११ लाखाची दंडाची रक्कम

डोंबिवली: वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणे, रेल्वे प्रवेशव्दारात रस्ता अडवून रिक्षा उभी करणे, अशा डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बेशिस्त रिक्षा चालकांवर येथील वाहतूक विभागाने मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे, ई चलान माध्यमातून कारवाई केली आहे.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 4 Oct 2023
खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मार्डचा इशारा

हेमंत पाटील यांनी शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर आंदोलन करतील, असा इशारा केंद्रीय मार्डकडून देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 4 Oct 2023
खासगी इमारतींच्या पुनर्विकासातील विरोधकांना तूर्तास अभय!

राज्य शासनाने महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायद्यात सुधारणा करीत पुनर्विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 4 Oct 2023
नांदेड रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : सुषमा अंधारे

पुणे : नांदेड येथील रुग्णालयात २४ नागरिकांचा बळी गेला असून त्या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. तर या विभागाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 4 Oct 2023
बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली, पती अगोदर परतला; मात्र तिला काळाने गाठले…

बुलढाणा: पितृपक्षासाठी ‘ती’ माहेरी आली… पती अगोदर परतला… दुसऱ्या दिवशी भावासह सासरी निघाली असता रोही च्या रुपात साक्षात काळ आडवा आला अन तिचा करुण अंत झाला.

सविस्तर वाचा…

13:45 (IST) 4 Oct 2023
पालकमंत्रीपदाचं फेरवाटप.. यादी जाहीर!

पुणे- अजित पवार</p>

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

13:37 (IST) 4 Oct 2023
गोंदिया जिल्ह्यातील ४३ जलाशये तुडुंब, पण गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमीच

गोंदिया : गेल्या वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील काही जलाशये पूर्णपणे तुडुंब होत आहेत. यंदाही ४३ जलाशये तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. तर ७ जलाशयांमध्ये ९० टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रबी हंगामात सिंचनासाठी पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सविस्तर वाचा…

13:23 (IST) 4 Oct 2023
बुलढाणा : ‘मॉडेल डिग्री’ महाविद्यालयासाठी ८३ कोटी मंजूर; उपकेंद्र कार्यान्वित होण्याची चिन्हे

शैक्षणिकदृष्ट्या मागास १६ जिल्ह्यांसाठी २०११ मध्ये मॉडेल कॉलेज मंजूर करण्यात आले होते. यात बुलढाण्यातील महाविद्यालयाचाही समावेश होता.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 4 Oct 2023
चंद्रपूर : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह चौघांवर गुन्हे दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, मनीष जेठानी, महेश जीवतोडे, अमित निब्रड यांनी सदर प्रकरणात कंपनीचे प्रतिनिधी उदया लक्ष्मण नायक यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 4 Oct 2023
मुंबई सेंट्रल जवळ लोकल ट्रेन रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 4 Oct 2023
हे मुद्दाम चाललंय का? मनसेनं ‘त्या’ मुद्द्यावर घेतला आक्षेप!

हे मुद्दामहून सुरु आहे का ? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो ? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का? – मनसेचा तीव्र आक्षेप

12:59 (IST) 4 Oct 2023
बुलढाणा : …अन् म्हणे गतिमान सरकार! जुलै महिन्यातील अतिवृष्टीची मदत ऑक्टोबरमध्ये!

बुलढाणा: जुलैमध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मदत निधी ऑक्टोबरमध्ये मंजूर करण्यात आल्याने लाखो शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 4 Oct 2023
“सव्वालाख स्वयंसेवक ‘इंडिया’चा प्रचार करणार”, योगेंद्र यादव यांची माहिती; म्हणाले…

नागपूर : मोदी सरकार सर्वच यंत्रणांचा ताबा घेत असून लोकशाहीचा गळा आवळत आहे. राज्यघटनेचा पाया कमकुवत करीत आहे. या हुकूमशाही सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ‘जितेगा इंडिया बनेगा भारत’ अभियानाअंतर्गत सव्वालाख स्वयंसेवक देशातील १५० लोकसभा मतदारसंघात कार्य करतील, अशी माहिती स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 4 Oct 2023
खगोलप्रेमींसाठी आजपासून पर्वणी! सलग पाच दिवस दिसणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक; जाणून घ्या वेळ आणि दिशा…

अकोला : पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

सविस्तर वाचा..

12:44 (IST) 4 Oct 2023
मुंबईत पदपथावरील मार्ग प्रतिबंधक अपंगांसाठी ठरत आहेत अडथळा, उच्च न्यायालयाकडून दखल

मुंबई: मुंबईतील पदपथावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेले मार्ग प्रतिबंधक (बोलार्डस्) अपंग व्यक्तींसाठी अडथळा ठरत असल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 4 Oct 2023
“सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून पत्रकारांच्या घरी छापे, अटकसत्र,” योगेंद्र यादव यांचा आरोप

पत्रकारांनी सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून मोदी सरकारने त्याच्या घरी धाडी घातल्या, त्यांना कित्येक तास ताब्यात ठेवले. आणि काहींना अटक केली, असे स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 4 Oct 2023
मुद्रणालय कामगारांना १६ हजार रुपये दिवाळी बोनस

कामगारांना या वर्षी १६ हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक बोनस असल्याचे सांगितले जाते.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 4 Oct 2023
खगोलप्रेमींसाठी आजपासून पर्वणी! सलग पाच दिवस दिसणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक; जाणून घ्या वेळ आणि दिशा…

अकोला : पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने फिरणारे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली. खगोलप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 4 Oct 2023
गोदावरीची सद्यस्थिती अतिदक्षता घेण्यासारखी, अवैध उत्खनन रोखण्यासाठी ब्रह्मगिरीचे सीमांकन गरजेचे – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

ब्रह्मगिरीवरील उत्खननाने बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकारकडे दाद मागून हे संपूर्ण क्षेत्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 4 Oct 2023
नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील मृत्युसत्राप्रकरणी याचिका दाखल करा, स्वतःहून दखल घेण्याची मागणी करणाऱ्या वकिलाला उच्च न्यायालयाचे आदेश

आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 4 Oct 2023
तांत्रिक बिघाडामुळे ‘मुंबई मेट्रो १’ विस्कळीत

सकाळच्या वेळी मेट्रोमध्ये मुंबईतील लोकल इतकीच गर्दी असते. यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 4 Oct 2023
“मुख्यमंत्री वडिलांच्या निधीमुळे खासदार शिंदेंच्या फक्त…”, राजू पाटील यांची श्रीकांत शिंदेंवर टीका, म्हणाले “‘नाथ’ घरी आहेत म्हणून…”

शासकीय यंत्रणांनी निधी दिला म्हणून करोडोच्या फक्त बाता करता, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 4 Oct 2023
मतदारसंघात संतप्त झाल्याच्या व्हायरल व्हिडीओवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण

मी इतर काही लोकांसारखा माझा मतदारसंघ विधानपरिषदेतल्या आमदारांच्या मार्फत चालवत नाही. मी माझ्या मतदारसंघात स्वत: उतरून काम करतो. दिवसाचे चार तास माझ्या कार्यालयात बसून मी आपल्या विभागातल्या लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवायची सवय आहे त्यांना लोकांमध्ये जाऊन प्रश्न कसे सोडवायचे हे समजणारच नाही. जे लोक काम करत नाहीत, त्यांची आपण कानउघाडणी करत असतो. असाच तो प्रयत्न होता. त्यामुळे तसा कुणी प्रयत्न करत असेल, तर त्यांना त्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा – राहुल नार्वेकर

11:53 (IST) 4 Oct 2023
“कुणी कितीही प्रयत्न केले तरी…”, विधानसभा अध्यक्षांची विरोधकांवर टीका; आमदार अपात्रतेवर स्पष्ट केली भूमिका!

राहुल नार्वेकर म्हणतात, “ज्यांना संविधानाचं, नियमाचं ज्ञान नाही अशा लोकांनी केलेल्या टिप्पणीबद्दल बोलण्यात वेळ घालवणं योग्य नाही!”

वाचा सविस्तर

11:51 (IST) 4 Oct 2023
राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली

गडचिरोली: राज्यभरातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्हा देखील लागोपाठ झालेल्या माता मृत्यूने हादरला आहे.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 4 Oct 2023
पिंपरी-चिंचवडमधील झोपड्यांना ‘गुगल प्लस कोड’

पिंपरी: झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे पुरविण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 4 Oct 2023
पुणेरी मेट्रोला महामेट्रोशी जोडणार!, दीडशे मीटरचा पादचारी पूल उभारणार

पुणेरी मेट्रो आणि शिवाजीनगर मेट्रो यांची स्थानके जिल्हा न्यायालय परिसरात आहेत. या दोन्ही स्थानकांना पादचारी पुलाने जोडण्यात येणार आहे. हा पादचारी पूल १५० मीटरचा असणार आहे. या पुलामुळे दोन्ही मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात जाणे सोपे होणार आहे.

सविस्तर वाचा

11:40 (IST) 4 Oct 2023
चुकीला माफी नाही! एक चूक पडणार कोटी रुपयांची; नेमका काय आहे प्रकार? वाचा सविस्तर…

वर्धा : नियम न पाळल्यास दंड ठोठावण्याचा प्रकार सर्वमान्य आहे. मात्र तो दंड किती असावा, याचीपण मर्यादा असते. वैद्यकीय क्षेत्रात सावधानता पाळणे अती आवश्यक समजल्या जाते. पण कोटीचा दंड?. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगातर्फे (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. ती न पाळल्यास मोठी दंडात्मक कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे. सविस्तर वाचा..

11:40 (IST) 4 Oct 2023
विरोधकांकडे असलेले मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ – विनोद तावडे

विरोधक किंवा भाजपपासून दूर गेलेल्या सहकारी पक्षांकडे असलेल्या देशातील १६० लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले असून, विरोधकांकडे असलेले हे मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जाईल, असे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘ लोकसत्ता ’ ला सांगितले.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 4 Oct 2023
विधानसभा अध्यक्षांची विरोधकांवर टीका

अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी कायदा, नियम व संविधानातील तरतुदींनुसारच निर्णय घेणार. कुणी कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, कोणतेही आरोप केले तरी मी नियमानुसारच काम करणार. माझा परदेश दौरा मी २६ तारखेलाच रद्द केला होता. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी परिषदेला उपस्थित राहणार नाही हे मी २६ तारखेलाच कळवलं होतं. पण २८ तारखेला त्यावर मोठी चर्चा घडवून आपणच हा दौरा रद्द करायला लावला असं चित्र लोकांसमोर आणायचा केविलवाणा प्रकार लोकांनी केला. अध्यक्षांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण अध्यक्ष तुमच्या गिधड धमक्यांनी घाबरत नाहीत. त्यांच्यावर अशा गोष्टींचा प्रभाव पडत नाही. – राहुल नार्वेकर

(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

News in Marathi: सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन्ही पक्षांमधील वादांवर सुनावणी!