Mumbai Maharashtra Today: राज्यात सध्या सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन पक्षांमधील आमदार अपात्रतेच्या प्रकरणांची जोरदार चर्चा आहे. एकीकडे शिवसेनेतील सत्ताधारी शिंदे गट व विरोधातील ठाकरे गट यांच्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गट व विरोधातील शरद पवार गट यांच्यातील पक्षनाव व चिन्हाचा तिढा निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आहे.

Live Updates

News in Marathi: आमदार अपात्रतेच्या मुद्द्याचं काय होणार?

11:28 (IST) 4 Oct 2023
रक्षक झाला भक्षक…, पोलीस कर्मचाऱ्याकडून शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन

शिकवणीवरुन घरी निघालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलीशी पुणे ग्रामीण पोलीस दलातील पाेलीस कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:12 (IST) 4 Oct 2023
मी नियमानुसारच काम करणार – राहुल नार्वेकर

मला कुणी कितीही प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, तरी मी नियमानुसारच काम करणार – राहुल नार्वेकर

10:59 (IST) 4 Oct 2023
धुळ्यात राजकीय विरोधकांवर छाप्यांची परंपराच; काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

कधीकाळी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून गणले जाणारे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी संबंधित संस्थांवर २०१८ मध्ये छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते.

सविस्तर वाचा

10:58 (IST) 4 Oct 2023
कोल्हापूरातील साखर कारखान्यांसमोर कर्जाचा डोंगर; हंगाम सुरु करताना राजकीय नेतृत्वाचा कस

ऊस गळीत हंगाम तोंडावर आलेला दुसरीकडे शेतकरी संघटनांनी एफआरपी पेक्षा अधिक रकमेसाठी आंदोलनाला सुरुवात केली असताना आगामी हंगामाच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्जाचा डोंगर कसा दूर करायचा याची चिंता सतावत आहे.

सविस्तर वाचा

10:51 (IST) 4 Oct 2023
ताडोबातील वाघांचा करिष्मा पाहून सारेच अवाक; पर्यटकांनी रोखून धरला श्वास

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्र आता कुठे पर्यटकांसाठी खुले झाले आहे, पण या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वाघांनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम ठेवला आहे. म्हणूनच गाभा क्षेत्र सुरू होवूनही पर्यटकांची पावले मात्र बफर क्षेत्राकडे वळत आहे.

सविस्तर वाचा

10:44 (IST) 4 Oct 2023
पिंपरी-चिंचवड: अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न; भाऊ करत नव्हता नावावर घर

पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती वादातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ येऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

सविस्तर वाचा…

10:40 (IST) 4 Oct 2023
वर्धा : छम छमाछम पार्टी! टार्गेट पूर्ण करणारे कृषी व्यवसायी झाले स्वतःच टार्गेट

कुही तालुक्यातील पाचगावच्या सिल्व्हर लेक फार्म या रिसॉर्टवर पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात जिल्ह्यातील कृषी व्यावसायिक सापडले. त्याची चांगलीच चर्चा होत आहे. छाप्यात तोकड्या कपड्यातील तेरा तरुणी नृत्य करीत होत्या.

सविस्तर वाचा

10:37 (IST) 4 Oct 2023
…ते काय बारशाचं आमंत्रण होतं का? – जितेंद्र आव्हाड

“इंडिया”ने निवडक ऍंकर्सवर बहिष्कार घातला तेव्हा ही पत्रकारांना धमकी आहे असा कांगावा भाजपाने केला होता. आता सकाळी सकाळी पत्रकारांच्या घरांवर धाडी घातल्या ते काय बारशाचं आमंत्रण होतं काय? – जितेंद्र आव्हाड

10:36 (IST) 4 Oct 2023
वन्यजीव सप्ताहातच वाघीण व हत्तीचा मृत्यु; शेतकरी बापलेक ताब्यात

वन्यजीव सप्ताह सुरू असतानाच वाघिणी पाठोपाठ एका रानटी नर हत्तीचा जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

10:32 (IST) 4 Oct 2023
धक्कादायक.. नागपुरातील मेडिकल-मेयो रुग्णालयात २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

10:32 (IST) 4 Oct 2023
‘‘मुलींनो कंत्राटी भरतीच्या विरोधात रस्त्यावर उतरा, अन्यथा तुम्हाला…’’, समाज माध्यमांवर वेगळीच चर्चा

नागपूर : राज्य शासन वर्ग २, ३ व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे शासन कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध राज्यातील युवा वर्ग करत आहे. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय फाडून महायुती सरकारचा निषेध राज्यातील अनेक भागांत होत आहे. अशातच आता कंत्राटी भरतीवरून अनेक मिम्स समोर यायला लागले आहे. त्यात समाज माध्यमांवर एक मिम्स धुकाकूळ घालत आहे.

सविस्तर वाचा…

10:31 (IST) 4 Oct 2023
चंद्रपूर : आनंदवनात तीन दिवसीय ‘आनंदवन बिजोत्सव’; शेती, मातीवर चर्चासत्रे व मार्गदर्शन

चंद्रपूर : वरोरा येथील बाबा आमटे यांच्या आनंदवनात ६, ७ व ८ ऑक्टोबरला तीन दिवसीय आनंदवन बिजोत्सोव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सेंद्रिय शेती, बीज संवर्धन, अन्न सुरक्षा, अन्न प्रक्रिया, मातीची गुणवत्ता तसेच प्रगतशील शेतकऱ्यांची संवाद व चर्चा करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:28 (IST) 4 Oct 2023
Video: शिंदे गटाच्या खासदारांनी नांदेड रुग्णालय अधिष्ठात्यांना शौचालय स्वच्छ करायला लावलं!

हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी – अमोल कोल्हे</p>

10:27 (IST) 4 Oct 2023
नाशिकमध्ये भंगार गोदामांना भीषण आग

शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या चुंचाळे शिवारात पहाटे भंगारच्या गोदामांना भीषण आग लागली.

सविस्तर वाचा…

10:26 (IST) 4 Oct 2023
भिवंडी सर्वाधिक कोंडीचे शहर; जगातील संथगती शहरांच्या यादीत भिवंडी पाचव्या क्रमांकावर

गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या भिवंडी शहराची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील संथगती शहरांच्या यादीत भिवंडी पाचव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा

10:26 (IST) 4 Oct 2023
नागपूर ‘एम्स’मध्ये दुसरी ‘ओपन हार्ट’ सर्जरी… वृद्धेला आयुष्यमान भारत योजनेतून लाभ

विविध तपासणीत वृध्द महिलेच्या एका धमनीत तब्बल ८० टक्के ‘ब्लाॅकेज’ असल्याचे पुढे आले.

सविस्तर वाचा…

10:22 (IST) 4 Oct 2023
सरकार खूनी नाही तर काय आहे? – संजय राऊत

महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू असताना एक डाऊटफुल मुख्यमंत्री व दोन हाफ उपमुख्यमंत्र्यांना त्याची चिंता नाही. घटनाबाह्य सरकार सत्तेत आहे. नांदेड, संभाजीनगर, नागपूरमध्ये जाऊन आक्रोश पाहा. सरकार खूनी नाही तर काय आहे? यांचा काय सत्कार करायचाय का? – संजय राऊत

10:18 (IST) 4 Oct 2023
हा आणीबाणीपेक्षा भयंकर प्रकार – संजय राऊत

न्यूजक्लिक्सच्या पत्रकार व संपादकांविरोधात गुन्हा दाखल करून अटकसत्र राबवण्यात आल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा सगळा आणीबाणीपेक्षा भयंकर प्रकार आहे, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

10:17 (IST) 4 Oct 2023
६ तारखेची सुनावणी आता ९ तारखेला!

विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

News in Marathi: सत्तेत व विरोधातही असणाऱ्या दोन्ही पक्षांमधील वादांवर सुनावणी!