शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलर नाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.
यातील बेशरम रंग गाण्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. तसेच चित्रपटाला बॉयकॉट करा मागणीही होत आहे. या सर्व प्रकारावर मराठा मंदिर आणि जी ७ मल्टीप्लेक्स या चित्रपटगृहांचे मालक मनोज देसाई यांनी भाष्य केलं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘चित्रपट चालणार का?’ ‘बॉयकॉट मोहीम’ या विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाला ‘धार्मिक रंग’ लावला जातोय यावर बोलताना ते असं म्हणाले, “अत्यंत चुकीचे आहे जर तुम्ही दिलीप कुमारच्या मुघल-ए-आझममध्ये धर्म आणला असता तर तो चित्रपट १७ वर्ष चालला नसता. अभिनेते अभिनेते असतात; त्यांचा धर्म पाहू नका – ही नम्र विनंती. याकडे मनोरंजन म्हणूनच बघा.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“गुटखा विकणारे स्टार्स आदर्श…” ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांची संतप्त प्रतिक्रिया
‘पठाण’ प्रदर्शित व्हायला अजून ९ दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच ‘पठाण’चा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यूएईमध्ये या चित्रपटाची आतापर्यंत ६५ हजार डॉलर्सची ४५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर त्याचप्रमाणे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही ‘पठाण’ पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत.
‘बॉयकॉट पठाण’ मोहिमेवर प्रसिद्ध चित्रपटगृहाच्या मालकांनी केलं भाष्य; म्हणाले…
या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.