Maharashtra News Updates, 21 February 2023 : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, आता आमदारांच्या अपात्रतेबाबात आजापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याबाबतची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…
Marathi News Updates : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयात याचिका; शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आत्मदहन आंदोलनात झालेला लाठीमार सुनियोजित षडयंत्रच होते. मला संपविण्याची सुपारी पोलिसांच्या माध्यमाने देण्यात आल्याचा गंभीर आरोप 'स्वाभिमानी' चे नेते रविकांत तुपकर यांनी येथे केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल आणि त्यांच्यामधला शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणारे राजकीय पक्षातील एजंट कोण याचे नाव जाहीर करावे अन्यथा त्यांची स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेण्याची लायकी नाही अशा शब्दात आमदार बच्चु कडू यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊतांचे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे, की सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे, हे तपासले पाहिजे. कोणत्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे चुकीचं आहे. खरं तर कोणाच्याही सुरक्षेच्याबाबतीत राज्य सरकार राजकारण करत नाही. त्यांना आवश्यक असेल तर सुरक्षा पुरवली जाईल. मात्र, संजय राऊतांना काही दिवसांपासून प्रसिद्धीची सवय लागली आहे. ते विनाकारण आरोप करतात. पूर्वी आम्ही त्यांच्या आरोपाला उत्तर देत होतो. मात्र, आता ते बिनडोक आरोप करतात. त्यांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मात्र, ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वसुलीची अडचण आहे. राज्यात वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर असून चंद्रपूर परिमंडळात ही थकबाकी ४९३ कोटींच्या घरात पोहोचली आहे.
एकाच शिक्षकांवर पाच वर्गांचा भार, शिक्षक एकाच वर्गात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात येताच पालकांची चक्क शाळा गाठून शाळेला कुलूप ठोकले.
राज्यातील शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली. त्याचा विपरीत परिणाम निकालावर पडण्याची दाट शक्यता आहे.
मोदी आणि शहांचे राजकारण हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यातून शिवसेना संपवली यांचा आनंद अमित शहा यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आसुरी आनंद व्यक्त करताना उद्धवचा वध केला आणि आपला अजून एक शत्रू आहे तो म्हणजे वंचित, म्हणून ते आमच्याही मागे लागण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुणे : “भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावले असतील तर त्याला जास्त महत्व देऊ नका, उद्या तुमचेही तसे फ्लेक्स लावले जाऊ शकतात. ही फ्लेक्सबाजी अतिउत्साही कार्यकर्त्यांची आहे, पण लोकशाहीत १४५ चा आकडा पार पाडणारा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे त्याला महत्व देऊ नका”, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईतील फ्लेक्सवर स्पष्टीकरण दिले. ते पिंपरीत बोलत होते.
भंडारा : आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
फेब्रुवारी - मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवावे, तसेच, परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या मार्गावर विद्यार्थ्याने बस थांबवण्यासाठी हात दाखवल्यास त्याला बसमध्ये घ्यावे, अशा सूचना एस.टी. महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना केल्या आहेत.
भंडारा जिल्हा प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे. मात्र अगदी पहिल्याच दिवशी काही परीक्षा केंद्रांवर सुसाट कॉपी चालल्याने या अभियानाचा फज्जा उडाला आहे.आज इयत्ता बारावीचा इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर होता.
नवी मुंबई : ऐरोली भागात असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मनोहर मढवी उर्फ एमके यांच्या तडीपार आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. एमके यांना ऑक्टोबर महिन्यात ठाणे रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. हा निर्णय पोलिसांचा नसून राजकीय असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे व्याघ्रप्रेम जगजाहीर आहे आणि या व्याघ्रदर्शनासाठी त्याची पहिली पसंती महाराष्ट्रालाच राहिली आहे. त्यामुळे तो ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात हमखास येतो.
पाचोरा तालुक्यातील जळगाव-पाचोरा-कजगावदरम्यान सुमारे नऊ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली असून, नांद्रा, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा व कजगावसह परिसरातील ग्रामस्थांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल आणि त्यांच्यामधला शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणारे राजकीय पक्षातील एजंट कोण याचे नाव जाहीर करावे. अन्यथा त्यांची स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेण्याची लायकी नाही अशा शब्दात आमदार बच्चु कडू यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह विविध मुद्द्यांवरू जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आजची सुनावणी पार पडली असून उद्या पुन्हा याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारने आठ वर्षांच्या कार्यकाळात अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. देशातील वाढत्या महागाईने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. हाताला काम नसल्याने बेरोजगार युवा वर्ग नैराश्यात आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.
कल्याण – जळगाव न्यायालयात मुलाचा हत्येचा बदला घेण्यासाठी गेलेल्या दोन मारेकऱ्यांपैकी एका फरार मारेकऱ्याला कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सुरेश रवी इंदाते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कर्ज थकल्याने शेतक-यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडू व जे या जमिनी लिलावात घेतील त्यांचे हातपाय तोडू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात दिला.नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतक-यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.
हृदय पिळवटून टाकणारी ही प्रेमकथा वणी तालुक्यातील कळमना या गावात घडली. श्वेता (२१) असे या प्रेमकथेतील मृत तरुणीचे नाव आहे. तर सचिन रमेश नवले (३०) या तरूणाविरूद्ध शिरपूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला श्वेताच्या मृत्यूप्रकरणी अटक केली.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. सविस्तर वाचा
विधिमंडळात बहुमत असलेले आमदार स्वतःला राजकीय पक्ष मानायला लागले आहेत. स्वतःच्या सोयीनुसार आदेश दिले जात आहेत. हा घटनात्मक मुद्दा आहे. मुळात चीफ व्हिप आणि डेप्युटी व्हिप यांची नियुक्ती राजकीय पक्षांद्वारे केली जाते - कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
https://twitter.com/LiveLawIndia/status/1627961865438629890?s=20
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत चाललेला आहे. त्यातूनच अनेक विद्यार्थी टोकाची भूमिकादेखील घेत आहेत. अशातच, आज इंग्रजी विषयाचा पेपर पाहताच एक विद्यार्थिनी वर्गखोलीतच बेशुद्ध झाली.
डोंबिवली औद्योगिक विभागात एमआयडीसीकडून काँक्रिट रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. ही रस्ते कामे करताना खोदकाम करताना जेसीबी चालकाकडून कंपन्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फोडण्यात येत असल्याने उद्योजकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवून ५० ते ६० जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र - तेलंगणा राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या महामार्गासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अजूनही जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी जागा शोधावी लागत आहे. शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यात आपल्याला शिरकाव करता येत नसल्याची सल एकनाथ शिंदे गटाला आहे.
श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझी हत्या करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघता हा विषय आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1627960551287701508?s=20
बिबटं वाघाच्या अधिवास क्षेत्रात आल्याने दोघांत झुंज झाली. यात बिबट्याला जीव गमवावा लागला. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव वनपिरक्षेत्रातील कक्ष क्रमांक २६७ मध्ये घडली. वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
आज समाज प्रगत झाला असला तरी महिला अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा कठीन स्थितीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकुन देत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला आहे.