Maharashtra News Updates, 21 February 2023 : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, आता आमदारांच्या अपात्रतेबाबात आजापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याबाबतची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…
Marathi News Updates : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयात याचिका; शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल
पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे गेल्या २४ तासांपासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोग दबावाखाली काम करते आहे. त्यांनी दिलेल्य निर्णय घटनाबाह्य आहे. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. आम्ही शिंदे गटाला शिवसेना मानत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना जनतेचा कौल घ्यावा लागेल. त्यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती आहे. त्यांना नवं चिन्ह मिळालं तरी लोक मत ठाकरेंच्या नावाने देणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
कर्ज थकल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय आम्ही हाणून पाडू व जे या जमिनी लिलावात घेतील त्यांचे हातपाय तोडू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार मिळवणारी मी तिसरी किंवा चौथी स्त्री असावी. गेल्या १७ वर्षात या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानला मोजक्याच स्त्रिया का पात्र वाटल्या, अशी प्रश्नवजा खंत ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांनी व्यक्त केली.
शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या कोट्यवधीच्या वनजमिनीवर लेआऊट तयार करून भूखंड विक्री केल्याच्या प्रकरणात भूमाफियांवर कारवाई करताना हयगय केल्यामुळे गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. लंच ब्रेक नंतर थोड्याच वेळात सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल.
विधासभा अध्यक्षांची निवड चुकीची आहे. नार्वेकर यांना बहुमतापेक्षा एक मत कमी आहे, असा युक्तिवाद कपि सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिंदे गटाच्या वकिलांनीही उत्तर दिलं आहे. शिंदे गटाला वगळल्यानंतर नार्वेकरांना निवडीसाठी आवश्यक ती मतं मिळाली असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात चर्चा सुरू आहे.
Sr Adv NK Kaul: The effective strength comes down to 249. Effective votes received were 125, which were over 50% than votes required. Even if there were 39 disqualifications, Mr Narwekar was proved.#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia
— Live Law (@LiveLawIndia) February 21, 2023
छत्तीसगड राज्यातील नवे रायपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ८५ वे अधिवेशन होत आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक समिती सदस्यास चक्क सतराशे रुपये मोजावे लागणार आहेत. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या अधिवेशनात प्रदेश सदस्यास एक हजार रुपये वार्षिक शुल्क भरायचे आहे.
बहुमत असणारे आसाममध्ये बसून नवीन नेता कसा निवडू शकतात? न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वी हे सर्व घडत होते. यासंदर्भात कोणतीही पक्षाची बैठक झाली नव्हती – कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
Sibal: So now the majority of legislative party can decide who's going to be the leader- while sitting in Assam?#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

पक्षांतील बंडखोरीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
बहुमत आहे की नाही हे न बघता राज्यापाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? – कपिल सिब्बल
Sibal: How can the governor swear in someone without knowing if they had majority – in the early hours of morning? #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

संविधानाच रक्षण करणं ही राज्यपालांचं कर्तव्य आहे. मात्र, मागील काही वर्षात राज्यपाल देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसून येत आहे. हे दुर्देवी आहे, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
Sibal: This has been seen in the recent past. It is unfortunate that governors are actively involved in the politics of the country.#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांना शपथ कशी देऊ शकतात? पक्षात दोन गट पडले असताना निवडणूक आयोग एका गटाला चिन्ह कसे देऊ शकते? असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय व्हावा, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली आहे.
आमदारांची संख्या जास्त असल्याने आम्हीच खरा पक्ष असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने आलेलं सरकार पाडण्यात आले. राज्यापालांनी त्यांना शपथही दिली. राज्यापालांचे अधिकार काय? असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
Sibal: It is a case of people who allege that they are a party because they are the legislature? What then are the powers of governor? If the governor swear him in as the CM, he actually topples a democratically elected govt #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

घटनेची १० वी अनुसूची आणि विधिमंडळातील पक्षाच्या भूमिकेचे अर्थ लावणे आवश्यक आहे. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? याला पक्षातील फूट म्हणता येईल का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.
लोहमार्ग ओलांडणे बेकायदा आहे. लोहमार्ग बेकायदा ओलांडल्यास रेल्वे कायद्यान्वये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या पुणे विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, दौंड, मिरज, साेलापूर, कोल्हापूर, अहमदनगर ही महत्त्वाची स्थानके लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येतात.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.
Senior Advocate Kapil Sibal: Can they say that there is a split in the party? This requires interpretation of tenth schedule and the role of party within the legislature. MLAs get elected on symbol of party. They're there because of the party. There's an umblical cord#ShivSena

Acid Attack कल्याण पूर्वेतील सूचक नाका भागातून पायी चाललेल्या एका पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर एका सफेद रंगाच्या मोटारमधील प्रवाशांनी ॲसिड फेकल्याने पादचारी गंभीररित्या भाजला आहे.
अमरावती: आपल्याला जो व्यक्ती, ज्याचे विचार पटत नाही, त्याच्यावर शाई फेकू नका, मग तो कोणताही राजकारणी असो. ती शाई फेकल्यापेक्षा गोळा करा आणि मतदानाच्या वेळी तीच बोटावर लावून निवडणुकीच्या काळात त्या शाईची किंमत त्यांना दाखवून द्या.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ, बिबट तथा अन्य वन्यजीव प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, ताडोबात २४ प्रकारच्या गवताच्या विविध जाती आहेत. गवताच्या अशा विविध जाती अन्य कुठल्याही प्रकल्पात नाही. यातील गवताच्या काही जाती अतिशय दुर्मिळ आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवेसना पक्षनाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. उद्या दुपारी ३.३० वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून यापूर्वीच कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
CJI DY Chandrachud: We will take it up tomorrow at 3.30 pm.#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

विद्यार्थ्यांनो, परीक्षेला सामोरे जाताना कुठलाही ताण मनावर ठेऊ नका. आजवर जो अभ्यास केला त्याचाच सराव करा. एकच प्रकरण घेऊन बसण्यापेक्षा सर्वांचा थोडाथोडा अभ्यास करा. परीक्षेच्या काळात सकस आहार आणि पुरेशी झोप घ्या. बिनधास्त परीक्षेला सामोरे जा.
pension news पदोन्नतीमध्ये आरक्षण, जुनी पेन्शनसह इतर मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्यकडून राज्यभरात २४ फेब्रुवारीला ‘लोकशाही की पेशवाई’ नावाने धरणे आंदोलन करणार आहे, अशी घोषणा महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केली.
Agniveer Recruitment: लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्निवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले असून ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेतील निकष या भरतीला लागू होणार आहेत. त्यामुळे भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाईन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल.
बिहारमध्ये नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची चिन्हे आहेत. संयुक्त जनता दल संसदीय मंडळाचे प्रमुख उपेंद्र कुशवा यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राष्ट्रीय लोक जनता दल या नव्या पक्षाची घोषणा त्यांनी केली आहे. आता ते स्वतंत्र वाट चोखाळणार की भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होणार याची उत्सुकता आहे. अर्थात कुशवा यांच्यामागे फार मोठी ताकद आहे अशातील भाग नाही. मात्र राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील एक प्रमुख नेते अशी ६३ वर्षीय कुशवा यांची ओळख आहे. बिहारमध्ये नितीशकुमारांनी साथ सोडल्याने एकाकी पडलेल्या भाजपचे कुशवा यांच्या पुढील चालीकडे लक्ष आहे.
भारतीय संघाने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली. यासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. त्यामुळे भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही आणि बॉर्डर-गावस्कर करंडक सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखणार हेदेखील सुनिश्चित झाले. भारताने २०१६ सालापासून बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या कसोटी मालिकांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. केवळ भारतात नाही, तर ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला नमवण्यातही भारताला यश आले आहे. भारताने हे वर्चस्व कशा प्रकारे प्रस्थापित केले, याचा आढावा.
प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धक्काबुक्की झाली. यानंतर सोनू निगमने पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्याने या ठिकाणी नेमकं काय घडलं याबाबत स्वतः माहिती दिली. तसेच आरोपीचं नाव घेत त्याने कोणाकोणाला धक्का दिला हेही नमूद केलं.
वेस्ट इंडिजनंतर कसोटी क्रिकेटमध्ये कोणी दबदबा राखला असेल, तर तो ऑस्ट्रेलिया संघाने. एक काळ असा होता की त्यांचा अकराव्या क्रमांकाचा फलंदाजही नेटाने खेळायचा. पण, आज याच संघाचे तळातील फळीचे सोडा आघाडीचे फलंदाजही खेळपट्टीवर टिकू शकत नाहीत. सलग सोळा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम दोन वेळा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेमके काय चुकत आहे, पुढे काय होणार, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न…
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला आहे.