Maharashtra News Updates, 21 February 2023 : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, आता आमदारांच्या अपात्रतेबाबात आजापासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याबाबतची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…
Marathi News Updates : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सर्वोच्च न्यायालयात याचिका; शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल
शारीरिक विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना यंदा टपाली मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, चिंचवडमध्ये २२१ ज्येष्ठ नागरिक, तर केवळ तीन शारीरिक विकलांग, तसेच कसब्यात ३०२ ज्येष्ठ नागरिक आणि केवळ चार शारीरिक विकलांग नागरिकांनी टपाली मतदानासाठी नोंदणी केली आहे.
राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे मागील २४ तासांपासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार,प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. जोवर आयोग २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेत नाही.तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या ठिकाणावरून हटणार नसल्याचा पावित्रा त्यांनी यावेळी घेतला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे मागील २४ तासापासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. शिवाय, ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निवडणुक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यासर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूस शिवसेनेकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबरच शिंदे गटावरही हल्ला चढवला आहे. आयोगाचा निर्णय अमान्य असून तो देणारा आयोग बरखास्त करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याचबरोबर राज्यातील सत्तासंघर्षांबाबत आता सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार)पासून सलग तीन दिवस सुनावणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून आपण तो मानायला तयार नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केलं होते. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, या मागणीबाबत शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच त्यांच्या निरनिराळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले. त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये करुन महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या भावना दुखावल्या. सर्वच स्तरातून आणि विरोधी पक्षांकडून कोश्यारींबद्दल प्रचंड विरोध होत होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं आहे. याविरोधात लागलीच उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट खडाजंगी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, सर्वोच्च न्यायालयापासून आता शेवटची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पक्षनेते आणि पदाधिकारी खरेदी करण्यासाठी रेटकार्ड ठरलेलं आहे, आरोपही त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. याविरोधातही सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केला आहे.