संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. यु. म. पठाण यांना येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा दलूभाई जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी जाहीर केला आहे.
गौरवपत्र व २१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय प्रा. पन्नालाल भंडारी स्मरणार्थ सूर्योदय सेवारत्न पुरस्कार लोक साहित्याच्या अभ्यासक प्रा. तारा भवाळकर (सांगली), इंदरचंद देसर्डा यांच्या स्मरणार्थ सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार लेखिका रेखा बैजल (जालना) यांना जाहीर झाला आहे. कांताबाई जैन स्मृतीप्रित्यर्थ सूर्योदय सेवा पुरस्कार लेखिका डॉ. अनुपमा उजगरे (ठाणे), सूर्योदय काव्य पुरस्कार कवयित्री प्रा. मीरा तराळेकर (बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच हजार रुपये व गौरव पत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप असून मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात. ऑगस्ट मध्ये भुसावळ येथे होणाऱ्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे जैन यांनी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, भुसावळ येथे होणाऱ्या नवव्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका रेखा बैजल यांची निवड करण्यात आली
आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा