लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून शहीद अशोक कामटे स्मुर्ति फाऊंडेशनच्या वतीने ४७० किलोमीटर दौडींने रविवारी शहीदांना अभिवादन करण्यात आले.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

सांगलीतील शहीद कामटे चौकातून मशाल व तिरंगा ध्वज घेवून सोमवार २० नोव्हेंबरला दौडीचा प्रारंभ झाला. तासगाव, विटा, पुसेसावळी, सातारा, पुणे, मारुंजी, खोपोली, पनवेल, माटुंगा या मार्गे ही दौड आज सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचली.

आणखी वाचा-“…कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या”, मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक

अपर पोलीस महासंचालक ( वाहतूक) रविंद्र सिंगल यांनी धावपटुंसोबत शहीद तुकराम ओंबळे स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सहभाग घेतला. दौडीतील धावपटूंचे स्वागत व कौतुक प्रमाणपत्र आणि मानचिन्ह गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उपनगर मुंबई मंगल प्रभात लोढा, विशेष पोलीस महानरीक्षक यशस्वी यादव, डीसीपी डॉ .प्रवीण मुंडे, पोलीस बॉईज संघटना अध्यक्ष राहूल दुभाले, डेप्युटी कमिशनर कस्टम सोहेल काजी, ज्योतिरादित्य कोरे, कामटे फाउंडेशनचे अध्यक्ष समित दादा कदम व विश्वगंधा कदम आदी उपस्थित होते.