आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktisangram Din) साजरा करण्यात येत आहे. औरंगाबामध्ये या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात. आणि त्यांच्या आदेशावरून हैदराबादला जात आहेत, असा आरोप दानवेंनी केला आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुनही आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू”; मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला कमी वेळ दिल्याचा शिवसेनेचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाला कमी वेळ दिला. दरवर्षी सकाळी ९ वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम होतो. पण यंदा मुख्यमंत्री सकाळी सात वाजता आले आणि कार्यक्रम झाला. १५ मिनिटांत हा कार्यक्रम आटोपता घेण्यात आल्यामुळे शिवसेना आता पुन्हा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दणक्यात कार्यक्रम करेल, असंही दानवे म्हणाले.

शिवसेनेच्यावतीनं पुन्हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम

सकाळी जरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं असलं, तरी शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा कार्यक्रम घेतला जाईल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात असतो. दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमापेक्षा यंदा मुख्यमंत्री शिंदे यांनी थोडक्यात हा कार्यक्रम आटोपता घेतला, असा आरोप करत शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- “..आता महाराष्ट्रातील भाजपावाल्यांचं यावर काय म्हणणं आहे?” केंद्रीय समितीच्या ‘त्या’ अहवालावरून शिवसेनेचा सवाल!

औरंगाबादमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री हैद्राबादला रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हैदराबादला रवाना होणार आहेत. हैदराबादमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक, या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामाचा एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता यावं, यासाठी औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर घेण्यात आला होता. दरम्यान, यावरुन शिवसेनेनं मात्र शिंदेंवर टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada mukti sangram din 2022 shiv sena leader ambadas danve criticized chief minister eknath shinde on marathwada liberation day dpj