उस्मानाबादेत महायुतीचा घोळ सुरूच!
उस्मानाबाद मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतर्फे विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनाच उमेदवारी मिळणार हे ६ महिन्यांपूर्वी निश्चित झाले होते. त्यामुळे डॉ. पाटील यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली. दुसरीकडे महायुतीचा उमेदवाराबद्दलचा घोळ अजूनही कायम आहे.
विरोधी पक्षाचा उमेदवार निश्चित झाला नसला, तरी डॉ. पाटील यांनी निवडणूक तयारी करून मोच्रेबांधणी सुरू केली. महायुतीची नेते मंडळी उमेदवारीच्या घोळामुळे एकमेकांवर कुरघोडय़ा करण्यात वेळ वाया घालवत आहेत.
भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी आपले सुपुत्र रोहन यांना उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत.
लातूरचा काँग्रेस उमेदवार १३ मार्चला निश्चित होणार
वार्ताहर, लातूर
पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने १३ मार्चला लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार निश्चित होईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे लातूर लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी पियुष त्रिवेदी (राजस्थान) व सहायक दीपक राठोड (हिमाचल प्रदेश) यांनी दिली.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लातूर व वर्धा या दोन मतदारसंघांत अंतर्गत लोकशाही पद्धतीने उमेदवार निवडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे सहायक लातुरात आले. शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार बैठक घेतली. मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. खासदार, आमदार, जि. प., पं. स., न. प. सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक, सरपंच, काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय., युवक काँग्रेस पदाधिकारी मतदार असतील. दि. ६ मार्चला मतदारयादी प्रकाशित होईल. दि. ८ मार्चला उमेदवार निश्चिती व १३ मार्चला सर्व मतदारांच्या मेळाव्यात प्रत्येक उमेदवारास ८ मिनिटे बोलण्याची संधी मिळेल. त्यानंतर मतदान होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे नाव केंद्रीय कार्यालयास कळवले जाणार आहे. लोकशाही पद्धतीने उमेदवार निश्चितीसाठी लातूरचे नाव आल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
नांदेडात काँग्रेसतर्फे कोण?
वार्ताहर, नांदेड
लोकसभेसाठी भाजपने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी सलगी असलेल्या डी. बी. पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या एका गटात अस्वस्थता वाढली. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाचे स्थानिक नेते कोणती भूमिका घेतात? ही चिंता काँग्रेस नेत्यांना सतावत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना उमेदवार कोण असेल? या विवंचनेत टाकले आहे.
भाजपने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेल्या डी. बी. पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. मात्र, डी. बीं.च्या उमेदवारीने लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले राम पाटील रातोळीकर, डॉ. अजित गोपछडे, डॉ. धनाजीराव देशमुख, गंगाराम ठक्करवाड यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. इच्छुकांपकी रातोळीकर व डॉ. देशमुख यांनी श्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे बळ आपल्यामागे असल्याचा दावा केला होता. शिवसेना-भाजपची पारंपरिक मते व राष्ट्रवादीची मदत आपली जमेची बाजू असल्याचे सांगत या दोघांनी उमेदवारीवर दावा केल्याने या दोघांपकीच कोणाची तरी वर्णी लागेल, असे वाटत होते. पण डी. बीं.ची सरशी झाल्याने भाजपमध्येही बंडखोरीचे वारे वाहत आहेत.
समाजवादी पक्षातून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या डी. बी. यांचा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी जिव्हाळा आहे. हीच बाब काँग्रेसच्या एका गटाला सतावत आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वातावरण निर्मिती केली असली, तरी उमेदवार कोण? या बाबत आपले पत्ते उघड केले नाहीत. विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांची गच्छंती जवळपास निश्चित झाल्याचे मानले जाते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण किंवा त्यांची पत्नी यांच्यापकी कोणाला उमेदवारी मिळेल, हे ठामपणे सांगता येत नाही. पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
डी. बी. यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसची व्यूहरचना वेगळी होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांची साथ मिळणार नाही, असे गृहीत धरून काँग्रेस नेते वावरत होते. पण आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत कसे घ्यावे, या बाबत खलबते सुरू झाली आहेत. धर्माबाद, उमरी, भोकर, अर्धापूर, मुदखेड, देगलूर आदी तालुक्यांतील राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकत्रे काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला वैतागले आहेत. गोरठेकर, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव, जि. प., तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापन करताना काँग्रेसने दिलेल्या सापत्नपणाची वागणूक राष्ट्रवादी नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे.
जालना राष्ट्रवादीला नाहीच – ठाकरे
वार्ताहर, जालना
दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत जालना लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वीपासूनच हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे सांगितले. राहुल गांधी यांच्या औरंगाबाद येथे ५ मार्चला आयोजित केलेल्या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त जिल्ह्य़ातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
जालना मतदारसंघात लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम आहे. गटबाजी टळावी, म्हणून काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत आहे का, असे विचारले असता त्याचा इनकार करून ते म्हणाले की, तसे काहीही नसून पक्षश्रेष्ठी लवकरच उमेदवार जाहीर करतील. या मतदारसंघातून जालना जिल्ह्य़ातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या बाबत विचार करण्यात येईल. परंतु अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी जिल्ह्य़ातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात राहुल गांधी यांचा औरंगाबाद दौरा यशस्वी करण्यासंदर्भात वक्तयांनी मते मांडली. सभेसाठी जालना जिल्ह्य़ातून पाचशे बसेस नेण्यात येतील, असेही सांगण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार कैलास गोरंटय़ाल, माजी आमदार धोंडिराम राठोड, शकुंतला शर्मा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, आर. आर. खडके आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांनी मेळाव्याचे संचालन केले. आमदार अब्दुल सत्तार, केशवराव औताडे, निरीक्षक विनायक देशमुख, जिल्हा काँग्रेस सचिव राम सावंत आदींची उपस्थिती होती.
समर्थकांकडून स्वागत, विरोधी सैनिकांची पाठ!
वानखेडेंना पुन्हा उमेदवारीने सेनेतील गटबाजी उफाळली
वार्ताहर, िहगोली
हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार सुभाष वानखेडे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाल्याने िहगोली, कळमनुरी, वसमतसह ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून स्वागत केले. मात्र, विरोधी गटातील नाराज शिवसनिकांनी या जल्लोषाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आता शिवसनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे.
िहगोली मतदारसंघातून सेनेकडून वानखेडे यांची उमेदवारी जाहीर होताच िहगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघांत वानखेडे समर्थकांनी फटाके फोडून स्वागत केले. मात्र, या जल्लोषात वसमतचे त्यांचे विरोधक व माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचे समर्थक सहभागी झाल्याचे दिसले नाही. माजी नगराध्यक्ष प्रकाश भोसले, नागनाथ कदम, संदीप नादरे, रोहिदास कदम, माधव काकडे, मनोज चव्हाण आदींचा यात समावेश होता. या विधानसभा मतदारसंघात प्रभुत्व गाजविणाऱ्या माजी मंत्री डॉ. मुंदडा यांचे समर्थक सेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील काळे, वसमत पालिकेतील नवीन चोकडा यांच्यासह इतर सदस्यांनीही जल्लोषापासून दूर राहणेच पसंत केले. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातही हेच चित्र होते. येथे बबलू पत्की, शिवराज पाटील, कांता पाटील, सागर थळपते, बाळू भिसे आदींचा समावेश होता. माजी आमदार गजाननराव घुगे यांच्या समर्थकांनी मात्र पाठ फिरविल्याचे चित्र होते. िहगोलीतील गांधी चौकात जिल्हाप्रमुख संतोष बांगर, भाजप जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, सेनेचे रामेश्वर िशदे, रामकिशन बांगर आदी सहभागी झाले होते. येथे मात्र शिवसनिकांपेक्षा भाजप कार्यकत्रे अधिक होते. माजी आमदार घुगे समर्थक नगरसेवक सुभाष बांगर, तसेच जि. प.तील सदस्यांनी पाठ फिरविल्याचे पाहावयास मिळाले.
जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त िहगोलीतील सेनेत दोन गट निर्माण झाले. एक गट खासदार वानखेडे, तर दुसरा गट माजी मंत्री डॉ. मुंदडा व माजी आमदार घुगे यांचा असल्याचे चित्र अनेक कार्यक्रमांतून उघड झाले. या गटबाजीकडे आतापर्यंत सेनेच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या दोन गटांतील अंतर अधिकच वाढले, हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सिद्ध झाले. या पाश्र्वभूमीवर सेनेंतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चच्रेसाठी तातडीने मातोश्रीवर बोलवले असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र, अजूनही काही पदाधिकारी कामाचे निमित्त सांगून मुंबईला गेले नसल्याचे सांगण्यात आले. पक्षश्रेष्टींकडून मात्र सेनेतील गटबाजी दूर करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा