सावंतवाडी : मालवण येथे  सागरी परिसंस्थेचे जतन करण्याच्या हेतूने वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम बुधवारी  यशस्वीरीत्या पार पडली.  ही मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एम. पी. सी. बी.), भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई (एफ. एस. आय. – मुंबई) , नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट यांच्या सहकार्याने सिंधुदूर्गच्या किनारपट्टीच्या पाण्यात आयोजित केली होती. या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Raj Thackeray Meeting : पराभूत उमेदवारांबरोबर राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीत काय ठरलं? EVM बाबत भूमिका काय? पदाधिकारी म्हणाले…

सागरी परिसंस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेने लक्ष केंद्रित केले. स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले. समृद्ध जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदूर्गमधील या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही  स्वच्छ्ता मोहीम अत्यंत महत्वाची आहे.

हेही वाचा >>> सांगली : पूलावरुन मोटार नदीत को

या कार्यक्रमाबद्दल बोलताना, श्री स्टॅलिन दयानंद (संचालक वनशक्ती) यांनी सागरी अधिवासांचे जतन करणे आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवणे या दोन्हींच्या महत्त्वावर भर दिला तसेच यामुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल , असे यावेळी बोलताना वनशक्ती चे दयानंद स्टॅलिन सांगितले. यावेळी श्री. अशोक कदम,श्री. रविंद्र मालवणकर, श्री. रोहित सावंत,जयवंत हजारे, प्रमोद माने,रविकिरण तोरसकर, रुपेश प्रभू, बाबी जोगी,दादा वेंगुर्लेकर,सौरभ ताम्हणकर, चारुशीला देवलकर,कु.मेगल,स्वाती पारकर,दर्शन वेंगुर्लेकर व इतर मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marine debris cleanup campaign at malvan zws