अलिबाग- सागरी वन्यजीवांची तस्करांना रोहा उपवन संरक्षक कार्यालयाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३५ टन कॅपिझ शेल सागरी वन्यजीव प्राण्यांचे अवशेष जेरबंद केले आहेत.

रोहा वनविभागातील उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांना या सागरी जीवांच्या अवशेषांच्या तस्करी बाबत खबर मिळाली होती. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील देवघर येथे वनक्षेत्रपाल एस पांढरकामे यांच्या पथकाने धाड टाकली यावेळी घटनास्थळी एका ट्रक मध्ये प्लास्टीकच्या गोण्यामध्ये कॅपिझ शेल या सागरी वन्यजीवांचे अवशेष आढळून आले. स्थानिक भाषेत याला काजगा असे म्हणतात. आणि याची बाजारातील किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. यावेळी काही जण या समुद्रजीवाच्या अवशेषांचा खरेदी विक्री व्यवहार करीत वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
infiltrating boat seized by fisheries department with the help of local fisherman
रत्नागिरीत घुसखोरी करणाऱ्या मलपी येथील मासेमारी बोटीचा थरारक पाठलाग, गस्ती नौकेला एक बोट पकडण्यात यश
is Tiger hunt in yavatmal Decomposed body found in Ukani coal mine
वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…


कॅपिझ शेल हा सागरी वन्यजीव वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील सूची क्र चार अन्वये प्रतिबंधित केला आहे. त्यामुळे घटनास्थळी खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या मुरलीधर महादेव म्हामूणकर, धनंजय मारुती बनसोडे, रोहित अरविंद सादरे, गोपाळसिंग पिरसिंज राजपूत, प्रेमदास श्रवणदास (राहणार-राजस्थान) यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८, ४८ (अ), ५० (१) सी, ५१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळी एकूण ३० ते ३५ टन मुद्देमाल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपास रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत व सहायक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Story img Loader