लडाखच्या सियाचीन येथे तैनात असलेले भारतीय लष्कराचे अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांचं कर्तव्यावर असताना निधन झालं आहे. लाईन ऑफ ड्युटी येथे तैनात असताना बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावातील सुपूत्र अक्षय लक्ष्मण गवते शहीद झाले असून ते भारतीय लष्कराच्या फायर अ‍ॅण्ड फ्युरी कॉर्प्समध्ये होते. अक्षय गवते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना पेन्शन आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा दावा करत विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत भारतीय सैन्याने माहिती दिली आहे.

भारतीय लष्कराने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार अक्षय गवते यांच्या कुटुबीयांना १ कोटी १३ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, सेवा निधी, आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडातून दिली जाणारी भरपाई, आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर फंडाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा समावेश आहे.

murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Nitin Gadkar
सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
pistol 28 cartridges seized from passenger at pune airport
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून २८ काडतुसे जप्त
Young man commits suicide after being harassed by moneylender Pimpri chinchwad news
धक्कादायक: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा, सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
Ajnup Gram Panchayat , Shahapur Taluka,
ठाणे : जमिनीच्या वादातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
Chandrapur, two-wheelers children fine,
चंद्रपूर : अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास पालकांनाच होणार दंड

शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला दिली जाणारी भरपाई

विम्याच्या स्वरुपात (नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स) ४८ लाख रुपये दिले जाणार.
अग्निवीरने (३०%) योगदान दिलेले सेवा निधी, सरकारच्या समान योगदानासह आणि त्यावर व्याज मिळून ४४ लाख रुपयांचा सानुग्रह
शहीद अक्षय गवतेंच्या अग्निवीर म्हणून राष्ट्रसेवेच्या ४ वर्षांपैकी जितका कार्यकाळ शिल्लक होता. तोवर त्यांच्या कुटुंबाला पैसे मिळतील. ही रक्कम १३ लाख रुपये इतकी असेल.
सशस्त्र दल युद्ध कोषातून (आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंड) ८ लाखांचा निधी दिला जाणार आहे.
AWWA (Army Wives Welfare Association) कडून तात्काळ ३० हजारांची आर्थिक मदत.
अशी एकूण १ कोटी १३ लाख रुपयांची मदत दिली जाईल.

आमदार रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपूत्र ‘अग्निवीर’ अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली! दुर्दैवाची बाब म्हणजे अग्निवीर असल्याने देशासाठी बलिदान देऊनही गवते यास ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचा अनुभव आपण नुकताच घेतलाय. ‘अग्निवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनीच या योजनेला कडाडून विरोध करायला पाहीजे.

Story img Loader