२३ जानेवारीला महाराष्ट्रातल्या पुणे शहरात एक बातमी समोर आली. भीमा नदीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचे मृतदेह आढळले. सुरूवातीला या सामूहिक आत्महत्या आहेत असं वाटलं होतं. मात्र पोलिसांनी या आत्महत्या नसून हत्या आहेत असं पुणे पोलिसांनी सांगितलं. या घटनेत काळी जादू करण्यात आली आहे का? असाही संशय समोर आला होता. मात्र त्याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुरूवातीला या सगळ्या आत्महत्या आहे आहेत असं वाटलं होतं. मात्र नंतर या हत्या असल्याचं स्पष्ट झालं.

पुण्यातल्या दौंडमधली घटना

पुणे शहरापासून ४५ किमी दूर असलेल्या दौंड तालुक्यातल्या यवत गावात भीमा नदीमध्ये सोमवारी चार आणि मंगळवारी तीन मृतदेह आढळले. हे सात मृतदेह एकाच कुटुंबातले आहेत. सर्वात आधी हे सगळं प्रकरण आत्महत्येचं आहे असं वाटलं होतं. पण हे सगळं प्रकरण हत्येचं आहे हे समोर आलं आहे.

Yugendra Pawar News
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : “युगेंद्र पवार विजयी होतील, बारामतीकर..”; श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य
early Morning oath taking by ajit pawar and devendra fadnavis
Early Morning Oath Taking : पहाटेच्या शपथविधीला आज…
Maharashtra Election Result
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या
North Maharashtra Assembly Election Result 2024 Live Updates in Marathi| North Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates in Marathi
North Maharashtra Region Election Results 2024 Live Updates: उत्तर महाराष्ट्रात महायुतीची १३ जागांवर आघाडी
Vidarbha Assembly Election Result 2024 Live Updates in Marathi| Vidarbha Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates in Marathi
Vidarbha Region Election Results 2024 Live Updates: विदर्भात महायुती १२ जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी…
Worli Assembly Election Results 2024 Live Updates in Marathi| Worli Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates
Worli Assembly Election Result 2024 Live Updates: वरळीमध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर
Pune Assembly Election Result 2024 Live Updates in Marathi| Pune Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates in Marathi
Pune Assembly Election Results 2024 Live Updates : बारामतीतून अजित पवार आघाडीवर; वाचा, पुणे जिल्ह्यातील सर्व २१ मतदारसंघातील अपडेट
Parli Election Result:Dhananjay Munde vs Rajesaheb Deshmukh
Parli Assembly Election Result 2024 Live Updates : धनंजय मुंडे परळीचा गड राखणार की शरद पवारांच्या राजकीय डावपेचांसमोर हरणार?
West Maharashtra Assembly Election Result 2024 Live Updates in Marathi| West Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates in Marathi
West Maharashtra Region Election Results 2024 Live Updates : पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आघाडीवर; राष्ट्रवादी अन् शिवसेनेची काय स्थिती, जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाची अपडेट

पोलीस तपासात काय काय समोर आलं?

पोलिसांनी हे प्रकरण का घडलं? याचा शोध सुरू केला. तसंच या हत्या नेमक्या का झाल्या याचाही छडा लावण्यास सुरूवात केली. सुरूवातीला पोलिसांच्या हाती कुठलाही पुरावा लागला नाही. त्यानंतर आणखी खोलात जाऊन पोलिसांनी या हत्यांचा तपास सुरू केला. सगळ्या मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पोलिसांना हे समजलं की हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत. मोहन पवार, त्यांची पत्नी संगीता पवार, त्यांची मुलगी राणी फलवरे, जावई श्याम फलवरे आणि या दोघांची तीन मुलं असे सातजण एकाच कुटुंबातले होते. पुणे पोलिसांनी तीन दिवस कसून तपास केला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की ही हत्या कौटुंबिक वादातून झाली आहे. मोहन पवार यांच्या चुलत भावाने आपल्या भावांसह या सगळ्या हत्या घडवून आणल्या आहेत.क्राईम तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

धक्कादायक! भीमा नदीत मृतदेह आढळलेल्या ७ जणांची आत्महत्या नव्हे हत्याच, पोलिसांचे खळबळजनक खुलासे

सात प्रेतांवर जखमांची एकही खूण नाही

नदीतून जी सात प्रेतं मिळाली त्या प्रेतांच्या शरीरावर कुठल्याही जखमांच्या खुणा नव्हत्या. या सातही मृतदेहांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. पोस्टमॉर्टेममध्ये या हत्यांचं कारण समोर आलं आणि ते होतं विष.पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट समोर आला तेव्हा हे लक्षात आलं की मोहन पवार यांच्या चुलत भावाने या सातही जणांच्या जेवणात विष कालवलं होतं. त्यामुळेच एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला.सात जणांचा विषारी अन्न खाल्ल्याने मृत्यू झाल्यानंतर मोहन पवार यांच्या चुलत भावाने आधी तीन प्रेतं आणि त्यानंतर चार प्रेतं नदीत फेकली. पोलिसांनी या प्रकरणात सातपैकी सहा आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे अशीही माहिती समोर आली आहे.

करणी-काळ्या जादूच्या संशयातून ३ चिमुरड्यांसह ७ जणांची हत्येचा आरोप, भीमा नदीवर नेमकं काय घडलं? वाचा…

अंधश्रद्धेतून हत्याकांड झालं नसल्याचीपोलिसांची माहिती

मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. मोहन पवार आणि कुटुंबीयांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होता. मात्र अंधश्रद्धेतून हत्याकांड झालं आहे, असं पोलिस तपासात अजूनही पुढे आलेलं नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.