Massive Fire in Ahmednagar sugar mill: अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी डिस्टिलरी विभागात ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी ७० ते ८० कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगीची घटना घडताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी गंगामाई साखर कारखान्यात कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी डिस्टिलरी विभागाला अचानक आग लागली. आग लागल्याचं समजताच कामगारांंमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक कामगार जीव मुठीत घेऊन कारखान्यातून बाहेर पडले. घटनास्थळी ठरावीक कालावधीत छोटे-छोटे स्फोट होत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे.