सांगली : मिरजेतील औषध निर्मिती कारखान्याला मंगळवारी दुपारी आग लागून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
उद्योजक प्रशांत महाबळ यांचे निवास व औषध कारखाना बालगंधर्व नाट्यगृहानजीक आहे. आज साप्ताहिक सुट्टी असल्याने कर्मचारी व महाबळ कुटुंबिय कोणीही याठिकाणी नव्हते. दुपारी अचानक धूर बाहेर दिसल्याने महापालिकेच्या अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील स्वयंपाकघरातील साहित्य जळाले. पथक आल्यानंतर पाणी फवारत असताना त्यातून वीज प्रवाहित होऊ लागल्याने काही वेळ बचाव कार्य थांबवण्यात आले. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.