रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मिऱ्या नागपूर महामार्गावरील डीमार्ट समोर खड्ड्यात आपटून सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाल्याने रत्नागिरी शहरात मोठी घबराहट उडाली. शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने एमआयडीसी आणि नगर परिषदेच्या अग्निशमन पथकांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळला, मात्र या प्रकाराने शहरात मोठी वहातूक कोंडी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरीतील कुवारबावकडून रत्नागिरीकडे येणारा अशोका गॅस कंपना टँकर (एमआर- ३८ एसी ७०७९) येत असताना शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हा टँकर कुवारबाव परिसरातील डिमार्ट समोर आला असता खड्ड्यात आपटल्याने मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाली. या वाहनाच्या दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू झाल्याने इतर वाहनधारकांची मोठी पळापळ झाली. टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पडत असल्याने मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र यावेळी तात्काळ अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले. याठिकाणी पोलीस यंत्रणाही दाखल झाली.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका

हेही वाचा – Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका

एमआयडीसी अग्निशमन पथकाचे अधिकारी सुरेश गोल्लार व त्यांच्या सहा साथीदारांनी तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन पथकातील नरेंद्र मोहिते, शिवम शिवलकर, सलीम नांदावाले, यश वालम हे घटनास्थळी दाखल होऊन गॅसवाहू टँकरमधून गळती होणारा गॅस थांबविण्यासाठी तात्काळ प्रयत्न केले. टँकरमधून होणारी ही गॅस गळती थांबवण्यात अग्निशामक दलाला यश आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.