माणगाव येथील नर्सिग कॉलेजमधून निष्णात परिचारिका निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी केले.
तटकरे यांच्या हस्ते माणगाव जनरल नर्सिग कॉलेजचे उद्घाटन झाले तसेच आमदार अनिल तटकरे यांच्या हस्ते एस. एस. निकम इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनियर सायन्स कॉलेजच्या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. याप्रसंगी आमदार अनिल तटकरे, माजी आमदार अशोक साबळे, माणगाव पंचायत समितीच्या सभापती अलका केकाणे, ज्ञानदेव पवार, सरपंच आनंद यादव, माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन डी. एस. कुलकर्णी, अध्यक्ष एम. एस. निकम, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, लोकसंख्येत वाढ होत आहे. हवामानाच्या बदलामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांची सहानुभूतीपूर्वक विचारणा करून त्यांना चांगली सेवा द्यावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या मनात विश्वासाहर्ता निर्माण करावी. ते पुढे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला महत्त्व आहे. प्रगत वैद्यकीय ज्ञानामुळे रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करता येतात.
या वेळी माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. एस. निकम, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे सचिव बी. बी. सप्रे यांनी माणगाव एज्युकेशन संस्थेच्या कार्याची माहिती विशद केली.
या वेळी माणगाव एज्युकेशन ट्रस्टला देणगी दिल्याबद्दल वसंत राठोड यांचा सत्कार ना. तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष एम. एम. निकम यांनी मंत्री महोदय व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. माणगाव एज्युकेशन संस्थेस आमदार अनिल तटकरे यांनी पाच लाख रुपये देत असल्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमास माणगाव एज्युकेशन सहसचिव एस. व्ही. मेहता, शालेय समिती अध्यक्ष पी. पी. ओक, खजिनदार ए. डी. जोशी, प्राचार्य एस. डी. बडगूज, सदस्य डॉ. ए. एस. निकम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डी. एस. कुलकर्णी यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा