मटका बुकीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला केला. परळी शहरातील तळपेठ भागात या घटनेत सहायक फौजदारासह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी विजय चव्हाणसह १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
परळी शहरातील तळपेठ भागात मटक्याची बुकी चालत असल्याच्या माहितीवरून बुधवारी (दि. ३) रात्री अकराच्या सुमारास सहायक फौजदार शशांक कदम त्यांच्या ९ सहकाऱ्यांसह या भागात दाखल झाले. विजय वैजनाथ चव्हाण ऊर्फ महाराज (वय ४०) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी चव्हाण याच्यासह उपस्थित असलेल्या दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यात शशांक कदम जखमी झाले, तर अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी सळईने वार करण्यात आला. जवळपास अर्धा तास सुरूअसलेल्या या प्रकारानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. पोलिसांनी परळी शहर ठाण्यात उपनिरीक्षक शशांक कदम यांच्या तक्रारीवरून विजय चव्हाण याच्यासह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
परळीत बुकी चालकांचा पोलीस पथकावर सशस्त्र हल्ला
मटका बुकीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला केला. परळी शहरातील तळपेठ भागात या घटनेत सहायक फौजदारासह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी विजय चव्हाणसह १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
आणखी वाचा
First published on: 05-07-2013 at 02:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matka king attacked on police in parali