Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईन ही कविता आणि त्यानंतर निवडणुकीतली घोषणा चांगलीच गाजली होती. त्यानंतर गुरुवारी भाजपा महाराष्ट्र या X हँडलने त्यांची ही कविता पोस्ट केली होती. तसंच मी पुन्हा येईन नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असं कॅप्शनही लिहिलं होतं. ज्यावरुन चर्चा सुरु झाल्या आणि भाजपाने अवघ्या एक तासात ही पोस्ट डिलिट केली. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

काय म्हटलं आहे विजय वडेट्टीवार यांनी?

“भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा येईनचा व्हिडीओ पोस्ट केला होता. जो पुढच्या तासाभरात डिलीट करण्यात आला. जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला तो डिलीट केला गेला. याचाच अर्थ मी पुन्हा येणार नसल्याचे हे संकेत आहेत. एक बाशिंग बांधून दोन जण तयार आहेत. यांची (भाजपा, शिंदे गट, राष्ट्रवादी गट) सत्ता येणार नाही तरीही हे नवरदेव होऊन बसले आहेत. आत्ताचं सरकार हे अध्यक्षांच्या भरवशावर सुरु आहे. २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. तसंच जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला तो सहज नव्हता. आतमध्ये काहीतरी शिजतं आहे.” असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
AI-generated video falsely claims Taylor Swift said wildfires are God's revenge for Gaza
“अमेरिकेतील आग ही गाझावरील हल्ल्यासाठी देवाने दिलेली शिक्षा”; टेलर स्विफ्टचे धक्कादायक विधान? पण खरं काय, वाचा
Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!

मराठा आरक्षणावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. पूर्वी सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा केंद्राला विचारून नव्हता. आरक्षणावरून स्थिती चिघळत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना ते नकार देत आहे. आज जी परिस्थिती आहे त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने सरकारने राजीनामा द्यावा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवस सरकारवर विश्वास का ठेवला? राज्य सरकार या काळात केंद्राला भेटायला गेले नाही. साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग? असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader