अमोल मिटकरी स्टेजवर असतील तर मी स्टेजवर जाणार नाही असं मेधा कुलकर्णींनी सांगितलं. बारामतीतल्या प्रचारसभेबाबतचा हा मुद्दा मेधा कुलकर्णी यांनी सांगितला. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. एका विशिष्ट समाजाची बाजू घेऊन जर मेधा कुलकर्णी बोलणार असतील तर लोक जी भीती व्यक्त करत आहेत की संविधान बदललं जाईल त्या चर्चांना हे वक्तव्य बळ देणारं आहे असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. आज सकाळपासूनच हा वाद रंगला आहे.

काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

“अमोल मिटकरी हे बारामतीतल्या एका कार्यक्रमात स्टेजवर येणार होते. मी त्या स्टेजवर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर अमोल मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची म्हणा, पण उगाच काही ऐकून घेणार नाही.” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Sharad Pawa
संतोष देशमुखांच्या मुलांचं शिक्षण ते कुटुंबाचं संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा

शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही

“ब्राह्मण समाज अतिशय साधा आहे. मात्र विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ट करणारे अमोल मिटकरी व्यासपीठावर येणार आहेत हे समजल्यावर मी ठाम भूमिका घेतली” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सत्कार मेधा कुलकर्णींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आणि अमोल मिटकरींबाबत काय भूमिका घेतली तेदेखील सांगितलं. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर अमोल मिटकरींनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- “अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही”, मेधा कुलकर्णींनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाल्या; “ब्राह्मण समाज..”

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहं भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्यावेळेस या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा कुणी व्यक्ती सदस्य होतो त्यावेळेस त्याला जी शपथ दिली असते ती महत्त्वाची असते. खासदारकीची शपथ दिल्यानंतर तो सदस्य कुठल्याही एका समाजाचा राहात नाही तो देशाचा होतो. जर शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजापुरते आहोत असं कुणी वागत असेल तर भारतीय संविधानाच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे. असाच प्रकार सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला.” असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं

“बारामतीत युवक मेळावा होता, त्या युवक मेळाव्यात सूरज चव्हाणही उपस्थित होते. मी त्यांच्याबरोबरच गेलो होतो. त्यावेळी या सदस्या स्टेजवर बसल्या होत्या, मला आयोजकांकडून जेव्हा समजलं तेव्हा मी तिथून निघून गेलो मीच तिथे थांबलो नाही. अशा लोकांसह मलाच बसायचं नाही जे स्वतःला एका समाजाचे समजतात. जर जबाबदारा नागरिक असाल तर तुम्ही कुणा एका समाजाचे असत नाहीत. मीच तिथून गेलो त्या बसून होत्या. इतक्या दिवसांपूर्वीचं वक्तव्य त्यांनी उकरुन काढलं आणि टाळ्या मिळवल्या. एका पदावर असताना एका समाजासाठी काम करत असतील तर हा भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वाला छेद देण्याचा प्रकार आहे. जर असंच चालू राहिलं तर जनतेच्या मनात जी शंका राज्यघटनेबाबत येते आहे त्याला अधिकृत दुजोरा मिळेल. त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आणि खोटं आहे. समाजाची दिशाभूल करणारं आहे, स्टेजवर त्या आल्या नव्हत्या असं नाही त्या आहेत हे कळल्यावर मी गेलो नव्हतो हे निर्विवाद सत्य आहे.” असं अमोल मिटकरी म्हणाले. टीव्ही ९ मराठीला त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

Story img Loader